IPL 2023, Rinku Singh Match Fees : विजयासाठी पाच चेंडूत 29 धावा हव्या होत्या. मैदानावर नवखा रिंकू सिंह होता... प्रत्येकाला वाटले हा सामना गुजरात जिंकणार... पण रिंकू सिंह याच्या डोक्यात काही वेगळेच होते. गड्याने अखेरच्या पाच चेंडूवर पाच षटकार लगावत कोलकात्याला थरारक विजय मिळवून दिला. यानंतर देशभरात रिंकू नाव गाजले.. कोलकात्याच्या चाहत्यासाठी रिंकू हिरो झाला... शाहरुख खान यानेही रिंकूचे कौतुक केले. पाच चेंडूवर पाच षटकार लगावत विजय मिळवून देणाऱ्या रिंकूला कोलकाता प्रत्येक सामन्याला किती मानधन देतोय, माहितेय का? याबाबत जाणून घेऊयात...


रिंकूला किती मिळते मानधन ?


2018 मध्ये कोलकात्याने रिंकू सिंह याच्यासोबत करार केला. तेव्हापासून रिंकू कोलकाता संघाचा भाग आहे. लागोपाठ सहा वर्ष कोलकात्याने रिंकू सिंह याला रिटेन केले. आयपीएल 2023 मध्ये रिंकूला कमी मानधन मिळाले. पण गुजरातविरोधात विस्फोटक खेळी करत त्याने सर्वांचे मन जिंकले. शाहरुख खान यानेही सोशल मीडियावरुन रिंकूचे कौतुक केले होते. या सामन्यात रिंकूने 21 चेंडूत 48 धावांची खेळी केली होती. यामध्ये एक चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. पाच षटकार तर अखेरच्या पाच चेंडूवर लगावले होते. रिंकू सिंह याला प्रत्येक सामन्यासाठी 4.23 लाख रुपये दिले जातात. म्हणजेच, 14 सामन्यासाठी कोलकाता रिंकूला 56 लाख रुपयांचे मानधन देतेय. त्याशिवाय कामगिरीच्या आधारावर काही सामन्यात त्याला सहा लाख रुपयांपर्यंत पैसे मिळतात. 


जितकी थरारक खेळी, तितकीच थरारक कहाणी 


रिंकू सिंहने ज्याप्रकारे थरारक खेळी करुन, गुजरातचा विजय जबड्यातून खेचून आणला, त्याच पद्धतीने त्याच्या आयुष्याची कहाणीही तितकीच थरारक आहे.  रिंकू सिंह हा उत्तर प्रदेशच्या अलिगढचा. तिथेच त्याचं कुटुंब राहतं. रिंकूचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी झाला. 5 भावंडांमध्ये रिंकू हे तिसरं अपत्य. रिंकूच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे ते गॅस सिलेंडर डिलिव्हरीचं काम करायचे. तिकडे  रिंकूला शाळेत असल्यापासूनच क्रिकेटची तुफान आवड होती. ज्यावेळी टीव्हीवर मॅच लागलेली असायची, त्यावेळी रिंकू टीव्हीसमोरुन हटत नव्हता. क्रिकेटवर त्याचं केवळ प्रेम नव्हतं तर क्रिकेट हे त्याचं वेड होतं. शाळेत असल्यापासूनच तो क्रिकेट खेळतो. तेव्हापासून 'धुलाई' हे त्याचं नियमित काम आहे. समोर कोणताही बोलर असो, त्याने फेकलेला यॉर्कर असो वा बाऊन्सर, त्याला सीमापार पोहोचवण्यासाठी रिंकू प्रसिद्ध होता. तेच त्याने गुजरातविरुद्धच्या मॅचमध्येही दाखवून दिलं. 


आणखी वाचा :
लखनौच्या विजयानंतर मेंटोर गौतमची गंभीर रिअॅक्शन; तोंडावर बोट, RCB च्या उत्साही चाहत्यांना इशारा?