DC Vs MI : मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या दुसऱ्याच सामन्यात दिल्लीनं मुंबईला 4 विकेट्सनं पराभूत केलं. मुंबईच्या संघानं दिलेलं 178 धावांचं लक्ष्य दिल्लीनं 10 चेंडू राखून पूर्ण केलं. या सामन्यात अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. ईशान किशनला तुफानी खेळी केली पण अक्षरच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर दिल्लीने विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात एक अप्रतिम कॅच देखील पाहायला मिळाली. मुंबईचा उपकर्णधार पोलार्डचा झेल दिल्लीत्या टीम सायफर्ट याने टीपला. हा झेल यंदाच्या आय़पीएलमधील पहिला अप्रतिम झेल ठरला आहे.


हा झेल मुंबईच्या संघ 16 व्या ओव्हरमध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. 16 व्या ओव्हरमध्ये कुलदीप यादव बोलिंग करत होता. यावेळी ओव्हरच्या 5 व्या चेंडूदरम्यान पोलार्डने मिडविकेटच्या दिशेने एक दमदार शॉट लगावला. पाहताक्षणी चेंडू बाऊन्ड्रीपार जाईल असं वाटत होतं. पण तितक्यात दिल्लीच्या टीम सायफर्टने अप्रतिम उडी घेत उत्कृष्ट असा झेल टीपला. ज्यामुळे पोलार्ड केवळ 3 धावा करत तंबूत परतला.



असा पार पडला सामना


मुंबईकडून ईशान किशन आणि रोहित शर्मा सलामीला आल्यानंतर 28 धावांवर शर्माच्या रुपात पहिली विकेट पडली. रोहित 41 धावा करून बाद झाला. रोहितपाठोपाठ तिलक वर्माही बाद झाला. त्यावेळी मुंबईचा स्कोर 14 षटकांत 118 धावा झाल्या आहेत. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी करण्यासाठी मैदानात आलेल्या किरॉन पोलार्डला मोठी धावसंख्या करता आली नाही. किरॉन पोलार्ड फक्त आठ धावा करून माघारी परतला. दरम्यान, ईशान किशनच्या आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबईनं 20 षटकात पाच विकेट्स गमावून दिल्लीसमोर 178 धावांचे लक्ष्य ठेवलं. ईशान किशन 48 चेंडूत 81 धावा केल्या. दिल्लीकडून मुरगन अश्विन, बेसील थम्पी यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. तर, टायमल मिल्सला एक विकेट्स मिळाली आहे. 


या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि टीम सेफर्ट संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र दिल्लीच्या अवघ्या 30 धावा असताना टी सेफर्ट बाद झाला. त्यानंतर मनदीप सिंहही बाद होऊन माघारी परतला. पुढे दोन धावा केल्यानंतर दिल्लीचा ऋषभ पंतच्या रुपात आणखी एक फलंदाज बाद झाला. दरम्याम, 32 धावांवर दिल्लीच्या संघानं तीन विकेट्स गमावल्या. त्यानंतर मात्र पृथ्वी शॉने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. तीन विकेट्स गेल्यानंतर रॉवमन पॉवेल मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यानंही शून्यावर आपली विकेट्स गमावली. त्यानंतर शार्दुल ठाकूरही 22 धावा करून झेलबाद झाला. शार्दुल बाद झाल्यानंतर अक्षर पटेल आणि ललित यादव यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. दिल्लीकडून अक्षर पटेलनं 17 चेंडूत 38 धावा केल्या. तर, ललित यादवनं 38 चेंडूत 48 धावा केल्या. ज्यामुळं दिल्लीच्या संघाला चार विकेट्स राखून विजय मिळवता आला.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha