IPL 2022, GT vs LSG : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात 8 जागी 10 संघ सामिल झाले आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या दोन संघाच्या एन्ट्रीमुळे आता स्पर्धा आणखी चुरशीची होणार हे नक्की. दरम्यान या नव्याने सामिल झालेल्या दोन्ही संघामध्ये आज लढत असणार असून पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आयपीएलच्या मैदानात उतरणार आहेत. यावेळी हार्दीक पंड्या गुजरातचं तर राहुल लखनौचं कर्णधारपद सांभाळणार आहे. 


गुजरात आणि लखनौ संघाचा विचार करता या दोन्ही संघानी यंदा पहिल्यांदाच स्पर्धेत सहभाग घेतला असला तरी दोन्ही संघातील खेळाडू मात्र कमालीचे अनुभवी आहेत. लखनौचा कर्णधार राहुलला याआधी पंजाब संघाचं नेतृत्त्व करण्याचा अनुभव देखील आहे. तर दुसरीकडे हार्दीक पहिल्यांदाच कर्णधार म्हणून आयपीएलच्या मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघाकडे गोलंदाजीमध्येही बरेच पर्याय असल्याने सामना चुरशीचा होणार हे नक्की.


कधी आहे सामना?


आज 28 मार्च रोजी होणारा हा गुजरात विरुद्ध लखनौ यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


गुजरात विरुद्ध लखनौ यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


हे देखील वाचा-