DC vs KKR, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स  (DC vs KKR) या दोन्ही संघात सामना पार पडणार असून दोघांची यंदाच्या हंगामातील कामगिरी सुमार आहे. दिल्ली कॅपिटल्सने 7 पैकी 3 सामने जिंकत 6 गुणांसह सातवं स्थान मिळवलं आहे. तर आठव्या स्थानावर असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 8 पैकी 3 सामने जिंकत सहाच गुण मिळवले आहेत. दोघांचा फॉर्म बऱ्यापैकी समान असल्याने आजचा सामनाही चुरशीचा होऊ शकतो. 


आज होणाऱ्या  दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स  या सामन्यात दोन्ही संघाकडून एक दमदार खेळी पाहायला मिळू शकते.दरम्यान आतापर्यंतच्या सामन्यांत खेळाडूंच्या फॉर्मचा विचार करता कोणत्या 11 (Probable 11) खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असेल ते पाहूया...


दिल्ली विरुद्ध कोलकाता अशी असेल ड्रीम 11 (DC vs KKR Best Dream 11)


विकेटकीपर- ऋषभ पंत


फलंदाज- डेव्हिड वॉर्नर, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ


ऑलराउंडर- आंद्रे रसेल, सुनील नारायण, रोवमेन पॉवेल


गोलंदाज- खलील अहमद, कुलदीप यादव, पॅट कमिन्स, उमेश यादव


कसा आहे पिच रिपोर्ट?


आजचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानात पार पडणार आहे. मैदानात सुरुवातीचे काही सामने हे चेस करणाऱ्या संघाच्या दिशेने झुकलेले पाहायला मिळालं. पण मागील काही सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी होताना दिसत आहे. इतर मैदानांपेक्षा काहीसं छोटं मैदान असल्याने षटकार, चौकारांची बरसात याठिकाणी होत असते. त्यामुळे वानखेडे मैदानात मोठी धावसंख्या उभी राहताना दिसते. पण आजचा सामना  सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी घेण्याचे समसमान चान्सेस आहेत. 


हे देखील वाचा-