IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 39व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला राजस्थान रॉयल्सकडून 29 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. राजस्थाननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या संघाची फलंदाजी फ्लॉप ठरली. राजस्थानच्या भेदक गोलंदाजीसमोर बंगळुरूच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. बंगळुरूच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. या सामन्यात बंगळुरूचा तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) गोल्डन डकचा शिकार झाला. ज्यामुळं त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.  


आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेल सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा विदेशी खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेल आतापर्यंत 12 वेळा खाते न उघडताच माघारी परतला आहे. याबाबत त्यानं अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला मागे टाकले आहे. आयपीएलमध्ये रशीद आतापर्यंत 11 वेळा शून्यावर बाद झालाय. 


- आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे विदेशी खेळाडू


1) ग्लेन मैक्सवेल- 12
2) राशिद खान- 11
3) सुनील नारायण- 10


रियान परागच्या शानदार खेळीमुळं राजस्थाननं 144 धावा केल्या
या सामन्यात नाणेफेक गमावून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थाननं 8 विकेट्स गमावून 144 धावा केल्या. राजस्थानकडून रियान परागने 31 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 56 धावांची खेळी केली. बंगळुरूकडून मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड आणि वानिंदू हसरंगा यांना प्रत्येकी दोन- दोन विकेट्स प्राप्त झाले. 


बंगळुरूचा संघ 115 धावांत आटोपला
राजस्थाननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा डाव 19.3 षटकांत 115 धावांवर आटोपला. बंगळुरूकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसनं 23, तर वानिंदू हसरंगानं 18 धावा केल्या. त्याच्याशिवाय शाहबाज अहमदनं 17 धावांची खेळी केली. राजस्थानकडून कुलदीप सेननं 4, तर रविचंद्रन अश्विननं 3 आणि प्रसिद्ध कृष्णानं 2 विकेट्स घेतल्या.


हे देखील वाचा-