Ambati Rayudu : अंबाती रायडूचं आराध्य दैवत सरडा आहे, सिद्धूच्या टीकेनंतर रायडू भडकला, म्हणाला, मी थालाचा भक्त...
अंबाती रायुडू सध्या आयपीएल 2025 च्या कॉमेंट्री दरम्यान केलेल्या विधानांमुळे चर्चेत आहे.

Ambati Rayudu and MS Dhoni : अंबाती रायुडू सध्या आयपीएल 2025 च्या कॉमेंट्री दरम्यान केलेल्या विधानांमुळे चर्चेत आहे. सामन्यादरम्यान तो चेन्नई सुपर किंग्ज आणि एमएस धोनीला उघडपणे पाठिंबा देताना दिसतो, ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अलिकडेच, कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याचा नवजोत सिंग सिद्धूशी जोरदार वाद झाला, जिथे दोघांनीही एकमेकांना 'सरडा' म्हटले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी रायुडूवर निशाणा साधला. आता रायुडूने पुन्हा एकदा धोनीचे कौतुक करून सर्वांना उत्तर दिले आहे.
अंबाती रायुडू नेहमीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर टीका करण्यासाठी आणि चेन्नई सुपर किंग्जचे कौतुक करण्यासाठी ओळखला जातो. प्रत्येक हंगामात, जेव्हा जेव्हा आरसीबी संघाला पराभवाचा सामना करावा लागतो, तेव्हा अंबाती रायुडू या संघावर जोरदार टीका करायचा. यावेळी आरसीबी काही नवीन रंगांमध्ये दिसत आहे. आरसीबीने आतापर्यंत आयपीएल 2025 मध्ये 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 1 सामना गमावला आहे. आज आरसीबीचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी आहे.
अंबाती रायुडूने ट्रोलर्सना दिले चोख प्रत्युत्तर
आरसीबी सामन्यापूर्वी अंबाती रायुडूने सोशल मीडियावर म्हणजेच एक्सवर ट्विट केले. ज्यामध्ये त्याने ट्रोलर्सवर निशाणा साधला आणि म्हटले की तो नेहमीच थालाचा चाहता आहे. रायुडूने लिहिले, "मी थाला चाहता होतो... थालाचा चाहता आहे... आणि नेहमीच थाला चाहता राहीन.... कोणी काय विचार करते याची मला 1% देखील पर्वा नाही. म्हणून कृपया अशा पेड पीआरवर पैसे खर्च करणे बंद करा आणि ते पैसे कुठेतरी दान करा. याचा फायदा अनेकांना होऊ शकतो."
I was a Thala’s fan
— ATR (@RayuduAmbati) April 10, 2025
I am a Thala’s fan
I will always be a Thala’s fan.
No matter what anyone thinks or does. It will not make a one percent difference.
So please stop spending money on paid pr and donate that to charity. Lot of underprivileged people can benefit.
अंबाती रायडूचे हे ट्विट व्हायरल...
अंबाती रायुडूचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. अंबाती रायुडूने चेन्नई सुपर किंग्जकडून 6 हंगाम खेळले आहेत. 2023 च्या आयपीएलमध्ये सीएसके पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन झाल्यानंतर रायुडूने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. चेन्नई सुपर किंग्ज शुक्रवारी 11 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सामना खेळणार आहेत. चेन्नई संघाने या हंगामात आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे. संघाने 5 सामने खेळले असले तरी, सीएसकेला सलग 4 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऋतुराज गायकवाडचा संघ पॉइंट्स टेबलवर नवव्या क्रमांकावर आहे.
हे ही वाचा -





















