(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022 : मुंबई, दिल्लीपाठोपाठ गुजरात टायटन्सही निळ्या रंगात, पाहा जर्सीचे फोटो
IPL 2022 : यंदा गुजरात आणि लखनौ हे दोन संघ आयपीएलमध्ये सामिल झाले असून दोन्ही संघाचे खेळाडू समोर आले असताना आता गुजरातने जर्सीही लॉन्च केली आहे.
IPL 2022 : आयपीएलमध्ये यंदा पहिल्यांदाच सामिल होणारा संघ गुजरात टायटन्सनं आज (13 मार्च) त्यांची नवी-कोरी जर्सी लॉन्च करणार असल्याचं सांगितलं होतं. त्याुप्रमाणे त्यांनी नुकतीच त्यांची नवी-कोरी जर्सी लॉन्च केली असून निळ्या रंगामध्येच ही जर्सी आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये मुंबई, दिल्लीनंतर आता गुजरातचा संघही निळ्या रंगाच्या जर्सीत दिसणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हार्दीक पंड्या निळ्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार असून यंदा जर्सी फक्त मुंबईची नसून गुजरातची असणार आहे.
गुजरातच्या या जर्सीचे फोटो त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलपूर्वीच दुसऱ्या अकाऊंट्सवरुन व्हायरल झाले आहेत. गुजरातची ही जर्सी गडद निळ्या रंगात असून ATHER या इलेक्ट्रीक व्हीआयकल कंपनीची स्पॉन्सरशिप दिसून येत आहे. यावेळी हार्दीक पंड्यासह संघ व्यवस्थापनातील महत्त्वाचे व्यक्ती फोटोंमध्ये लॉन्चींग दरम्यान दिसत आहेत.
असा आहे गुजरातचा संघ
शिलेदार – हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (8 कोटी), मोहम्मद शमी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी), अभिनव सदरंगानी (2.6 कोटी), राहुल तेवातिया (9 कोटी), नूर अहमद (30 लाख), साई किशोर (3 कोटी), डॉमनिक ड्रेक्स (1.10 कोटी), जयंत यादव (1.70 कोटी), विजय शंकर (1.40 कोटी), दर्शन नालकंडे (20 लाख), यश दयाल (3.20 कोटी), अल्झारी जोसेफ (2.40 कोटी), प्रदीप सांगवान (20 लाख), मॅथ्यू वेड (2.40 कोटी), वृद्धिमान साहा – (1.90 कोटी), डेविड मिलर – ( 3 कोटी), वरुण अरॉन- 50 (लाख रुपये), गुरकीरत मान सिंह- (50 लाख रुपये), नूर अहमद – (30 लाख रुपये), साईं सुदर्शन- 20 लाख रुपये
हे देखील वाचा-
- IPL 2022 Full Schedule: आयपीएल 2022 चं बिगुल वाजलं, संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणाचा सामना कोणाशी? पाहा एका क्लिकवर
- IPL 2022 : आयपीएलचे 70 सामने मुंबई-पुण्यात, MI-CSK वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, पाहा कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये?
- IPL Records : आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारे धाकड यष्टीरक्षक, 'हे' आहेत टॉप 5
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha