IPL winners list : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने पदार्पणातच आयपीएल चषकावर नाव कोरले. IPL 2022 च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) पराभव करत खिताब जिंकला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात  130 धावा केल्या.. प्रत्युत्तरदाखल गुजरातने  18.1 षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात धावांचा यशस्वी पाठलाग केला. यासह आयपीएलला नवीन विजेता मिळालाय... आयपीएल खिताब जिंकणारा गुजरात सहावा संघ ठरलाय.  


या संघाने जिंकलाय खिताब?
याआधी राजस्थान रॉयल्सने एकवेळा (2008), डेक्कन चार्जर्सने एक वेळा (2009), चेन्नई सुपर किंग्सने चार वेळा (2010, 2011, 2018, 2021), कोलकाता नाइट रायडर्सने दोन वेळा (2012, 2014) मुंबई इंडियन्सने पाच वेळा (2013, 2015, 2017, 2019, 2020) आणि सनराइजर्स हैदराबादने एक वेळा (2016) आयपीएल खिताबवर नाव कोरलेय.  


आयपीएल चषख जिंकणाऱ्या संघाची यादी -  
राजस्थान रॉयल्स- आयपीएल 2008
डेक्कन चार्जर्स- आयपीएल 2009
चेन्नई सुपर किंग्स- आयपीएल 2010, 2011, 2018, 2021 
कोलकाता नाइट राइडर्स- आयपीएल 2012, 2014
मुंबई इंडियन्स- आयपीएल 2013, 2015, 2017, 2019, 2020
सनराइजर्स हैदराबाद- आयपीएल 2016
गुजरात टायटन्स - आयपीएल 2022 


हार्दिक पाचव्यांदा विजयी संघाचा ठरला भाग
हार्दिक पांड्या याआधी मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग होता. मुंबईनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. यातील चार ट्रॉफी जिंकताना हार्दिक मुंबईच्या संघाचा सदस्य होता. यावर हार्दिक पांड्या म्हणाला की, "माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की, मी पाचवेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे आणि प्रत्येक वेळी विजयी संघाचा भाग ठरलो आहे."


हार्दिक पांड्याचं दमदार प्रदर्शन
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्यानं त्याच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल केला आहे. या हंगामात त्यानं तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फंलदाजी केली आहे. हार्दिक पांड्यानं या हंगामात 15 सामन्यात 487 धावा केल्या आहेत. यादरम्यान पंड्याचा स्ट्राइक रेट 131.27 होता. तर, सरासरी 44.27 होती. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत हार्दिक पांड्या चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय या हंगामात त्यानं आठ विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत.






हे देखील वाचा-