IPL 2022: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामाला नवा विजेता मिळाला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सनं सात गडी राखून राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग घेतलेल्या गुजरातच्या संघानं आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. परंतु, गुजरातच्या विजयानंतर सोशल मीडियावर फिक्सिंग हॅशटॅग ट्रेण्ड सुरू झाला आहे. गुजरातच्या संघानं मॅच फिक्सिंग करून ट्रॉफी जिंकली आहे, असा आरोप नेटकरी करत आहेत. 


सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगचे मीम्स व्हायरल
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थानला सात विकेट्सनं पराभूत करून आयपीएलचा खिताब जिंकला. पहिल्याच हंगामामध्ये थेट अंतिम सामन्यात धडक मारून गुजरात टायटन्सनं जेतेपद पटकावलं. गुजरात टायटन्स संघ विजेता ठरल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाडला आहे.गुजरातच्या संघानं मॅच फिक्सिंग करून ट्रॉफी जिंकली आहे, असा आरोप नेटकरी करत आहेत. यादरम्यान, अमित शहा आणि नरेंद्र मोदींचे मीम्सदेखील व्हायरल होत आहेत.


ट्वीट-



ट्वीट-



ट्वीट-



ट्वीट- 



ट्वीट- 



ट्वीट- 



गुजरातचा सात विकेट्सनं विजय
आयपीएल 2022च्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, गुजरातच्या भेदक गोलंदाजीसमोर राजस्थानच्या संघानं 20 षटकात 9 विकेट्स गमावून 130 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातच्या संघानं 18.1 षटकातचं राजस्थाननं दिलेलं लक्ष्य पूर्ण करत आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. या सामन्यात गुजरातकडून हार्दिक पांड्यानं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर साई किशोरनं दोन विकेट्स मिळवल्या. तर, मोहम्मद शामी, यश दयाल आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतली. 


हे देखील वाचा-