IPL 2022: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान यांच्यात रविवारी (29 मे 2022) खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर आयपीएलला नवा विजेता मिळला. आयपीएल 2022 मधील अंतिम सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानला सात विकेट्सनं पराभूत करून विजेतेपद पटकावलं. या विजयात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) महत्वाची भूमिका बजावली. गुजरातच्या संघाची कर्णधारपदाची जबाबदारी संभाळताना त्यानं मैदानात अनेक योग्य निर्णय घेतले. ज्यामुळं गुजरातच्या संघानं केवळ आयपीएल 2022 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला नव्हेतर, ट्रॉफीवरही नाव कोरलं. गुजरातनं ट्रॉफी जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्तांकोविक (Natasa Stankovic) भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 


दरम्यान, नताशा स्टॅनकोविकला पती हार्दिकच्या यशाबद्दल अश्रू आवरता आले नाहीत. शुभमन गिलनं षटकार ठोकून गुजरातला चॅम्पियन बनवताच हार्दिक पांड्यासह बाकीच्या खेळाडूंनी मैदानात आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, खेळाडूंचे कुटुंबीयही मैदानात उतरू लागले. नताशा मैदानावर पोहोचल्यावर तिनं लगेचचं हार्दिकला मिठी मारली. त्यावेळी तो खूप भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. या भावनिक सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केले जात आहेत.


गुजरातची भेदक गोलंदाजी
या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, गुजरातच्या भेदक गोलंदाजीसमोर राजस्थानच्या संघानं 20 षटकात 9 विकेट्स गमावून 130 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातच्या संघानं 18.1 षटकातचं राजस्थाननं दिलेलं लक्ष्य पूर्ण करत आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. या सामन्यात गुजरातकडून हार्दिक पांड्यानं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर साई किशोरनं दोन विकेट्स मिळवल्या. तर, मोहम्मद शामी, यश दयाल आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतली. 


हार्दिक पांड्याला सामनावीराचा पुरस्कार
सामन्यात विजयी संघाचा कर्णधार हार्दिकला सामनावीर पुरस्कार मिळाला. त्यानं गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये कमाल कामगिरी केली. गुजरात संघाच्या सर्वच खेळाडूंनी कमाल गोलंदाजी केली. पण कर्णधार हार्दिक पांड्याने मात्र सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत महत्त्वपूर्ण तीन विकेट्स घेतल्या. पांड्यानं 4 षटकात 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यात संजू, बटलर आणि हेटमायर या महत्त्वाच्या विकेट्स होत्या. याशिवाय त्यानं फलंदाजीत 30 चेंडूत 34 धावा केल्या.  ज्यामुळं त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.


पाहा व्हिडिओ- 



हे देखील वाचा-