GT vs SRH, IPL 2023 Live: गुजरात-हैदराबादमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
GT vs SRH Live Score: हैदराबाद प्लेऑफचे आव्हान जिवंत ठेवणार की गुजरात क्वालिफाय होणार ? आजचा सामना रंगतदार होणार
LIVE
Background
IPL 2023, Match 62, GT vs SRH : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामात, गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (GT vs SRH) यांच्यातील 62 वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. हैदराबादचा कर्णधार एडेन मार्करामसमोर गुजरातच्या हार्दिक पांड्याचं तगडं आव्हान असणार आहे. तसेच, आयपीएलच्या 16 व्या मोसमात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. GT नं हा सामना जिंकल्यास, IPL 2023 मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरणारा तो पहिला संघ बनेल.
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या पॉईंट टेबलमधील स्थितीबाबत बोलायचं तर, जीटी 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. गुजरातनं आतापर्यंतच्या 12 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले आहेत आणि 4 सामन्यांत पराभव झाला आहे. दुसरीकडे, SRH बद्दल बोलायचं तर, संघ 8 गुणांसह 8 व्या स्थानावर आहे. संघ सीरिजमधून जवळपास बाहेर पडला असला तरी, आपले उर्वरित तिनही सामने जिंकले, तर तो 14 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करूच शकणार नाही. दरम्यान, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी GT ला उर्वरित दोन सामन्यांपैकी फक्त एकच जिंकावा लागेल.
शमी-रशीदचा बोलबाला
गुजरातच्या मोहम्मद शामीनं प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना पळता भुई थोडी केली आहे. तर रशीद खाननं आपल्या फिरकीनं भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडलली आहे. शमीनं या मोसमात आतापर्यंत 19 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर राशिद खाननं 23 विकेट घेत पर्पल कॅपवर कब्जा केला आहे.
पॉईंट टेबलची परिस्थिती काय?
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या पॉईंट टेबलमधील स्थितीबाबत बोलायचं तर, जीटी 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. गुजरातनं आतापर्यंतच्या 12 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले आहेत आणि 4 सामन्यांत पराभव झाला आहे. दुसरीकडे, SRH बद्दल बोलायचं तर, संघ 8 गुणांसह 8 व्या स्थानावर आहे. संघ सीरिजमधून जवळपास बाहेर पडला असला तरी, आपले उर्वरित तिनही सामने जिंकले, तर तो 14 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करूच शकणार नाही. दरम्यान, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी GT ला उर्वरित दोन सामन्यांपैकी फक्त एकच जिंकावा लागेल.
प्लेऑफवर गुजरातची नजर
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सची नजर प्लेऑफवर असेल. हार्दिक पांड्याच्या संघाला अंतिम चारमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. जर गुजरात टायटन्स हैदराबादविरुद्ध जिंकला तर आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा तो पहिला संघ ठरेल. आयपीएलच्या 16व्या हंगामात गुजरातनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. यादरम्यान त्यानं 12 सामने खेळले आहेत, ज्यात 8 सामने जिंकले आणि 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 16 गुणांसह गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या स्थानावर कायम आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल सर्व काही...
नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर ती लाल आणि काळ्या मातीनं बनलेली आहे. दुसरीकडे, काळी माती थोडी घन असते तर लाल माती थोडी मऊ असते. या मैदानावर फिरकी गोलंदाजीला खूप मदत मिळते. अशा स्थितीत फलंदाजांसमोर फिरकी गोलंदाजांचं आव्हान असणार यात काही शंकाच नाही.
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेईंग 11
गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग 11
ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, अल्जारी जोसेफ, मोहित शर्मा, मोहम्मद शमी
सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग 11
अनमोलप्रीत सिंह, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडम मार्करम, हेनरिक क्लासेन, ग्लेन फिलिप, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, ट नटराजन, मयंक मार्कंडेय, फजलहक फारूकी
गुजरातचा विजय
हैदराबादची 154 धावांपर्यंत मजल
हैदराबादला नववा धक्का
हैदराबादला नववा धक्का बसलाय.. भुवनेश्वर कुमार बाद
हैदराबादला आठवा धक्का
क्लासेन 64 धावांवर बाद झालाय... हैदराबादला आठवा धक्का बसलाय.
हैदराबादच्या 100 धावा पूर्ण
हैदराबादच्या 100 धावा पूर्ण
हेनरिक क्लासेनची एकाकी झुंज
हेनरिक क्लासेनची एकाकी झुंज