IPL 2022: इंग्लंड क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाज अॅलेक्स हेल्सच्या (Alex Hales) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा सलामीवीर तीन वर्षांनंतर इंग्लंड संघात पुनरागमन करू शक्यता वर्तवली जात आहे. हेल्सला 2019 मध्ये इंग्लंडच्या एकदिवसीय विश्वचषक संघातून वगळण्यात आलं होतं. हेल्सनं प्रतिबंधक पदार्थाचं सेवन केल्यामुळं त्याला संघाबाहेर करण्यात आलं होतं, अशी माहिती गार्डियनच्या अहवालात देण्यात आली होती.
अॅलेक्स हेल्सला 2019 मध्ये इंग्लंडच्या एकदिवसीय विश्वचषक संघातून वगळण्यात आले होतं. त्यानं प्रतिबंधक पदार्थाचं सेवन केल्यामुळं त्याच्यावर तीन आठवड्यांची बंदी घालण्यात आली होती. 33 वर्षीय फलंदाजानं इंग्लंडकडून 11 कसोटी, 70 एकदिवसीय आणि 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हेल्स शेवटचा इंग्लंडकडून 2019 मध्ये खेळला होता.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक रॉब की म्हणाले, "मला त्या निर्णयाशी संबंधित लोकांशी बोलावं लागेल, परंतु मला वाटते की अॅलेक्स हेल्स निवडीसाठी उपलब्ध असतील." मला वाटते की त्याने पुरेसा वेळ बाहेर घालवला आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्याचा संघात समावेश झाला आहे. हा एक वेगळ्या प्रकारचा वाद आहे.
अॅलेक्स हेल्सची आयपीएलमधून माघार
T20 लीग खेळाडू अॅलेक्स हेल्सने बायो-बबलच्या थकव्याचे कारण देत यावर्षी इंडियन प्रीमियर लीग मधून माघार घेतली होती.ज्यामुळं सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती.
एकाच षटकात आठ षटकार मारण्याचा विक्रम
अॅलेक्स हेल्सने 2005 मध्ये वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी एका टी-20 टूर्नामेंट सामन्यात एकाच षटकात 55 धावा केल्या होत्या. या षटकात त्यानं 8 षटकार मारले होते. त्यानंतर तो प्रकाशझोतात आला होता.
हे देखील वाचा-
- DC vs LSG, Toss Update : लखनौचा कर्णधार केएल राहुलने निवडली प्रथम फलंदाजी, दिल्लीकर करणार गोलंदाजी; पाहा आजची अंतिम 11
- SRH vs CSK, Head to Head : हैदराबाद आणि चेन्नईमध्ये रंगणार आजची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी
- IPL 2022 : बर्थडे बॉय रोहित आऊट झाला अन् पत्नीच्या डोळ्यात अश्रू तराळले! अश्विनच्या पत्नीचा रितिकाला आधार