DC vs LSG : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आजच्या 45 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटलस आणि लखनौ सुपरजायंट्स (MI vs LSG) यांच्यात सामना रंगला असून नुकताच लखनौचा डाव आटोपला आहे. त्यांनी 195 धावा केल्याने दिल्लीसमोर 196 धावांचे आव्हान आहे. आजच्या सामन्यातही लखनौचा कर्णधार केएल राहुलने दमदार खेळी केली. त्याने 51 चेंडूत 77 धावा केल्या. दुसरीकडे दीपक हुडानेही 52 धावा करत त्याला चांगली साथ दिली. ज्यामुळे आता दिल्लीला 120 चेंडूत 196 धावा करायच्या आहेत.


सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कर्णधार राहुलने घेतला आणि त्याने दीपकच्या मदतीने हा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध केलं. सुरुवातीला 23 धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी डी कॉकने केली. त्यानंतर मात्र राहुल आणि दीपक यांनी अप्रतिम भागिदारी करत संघाचा स्कोर 100 पार नेला. त्यानंतर दीपक 52 धावा करुन बाद झाला. काही वेळाने राहुलही 77 धावा करुन तंबूत परतला. अखेर मार्कस स्टॉयनिस (नाबाद 17) आणि कृणालने (नाबाद 9) धावा करत संघाचा स्कोर 195 धावांपर्यंत नेला. ज्यामुळे आता दिल्लीला 196 धावा करायच्या आहेत.


ठाकूरची एकाकी झुंज


दिल्लीच्या गोलंजाजांना आज जणू विकेट्सच घेता येत नव्हत्या. केवळ शार्दूल ठाकूने एकहाती तीन विकेट घेतल्यामुळे लखनौचे तीन गडीच तंबूत परतले. शार्दूलने 4 ओव्हमध्ये 40 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय इतरही गोलंदाज बऱ्यापैकी महाग पडले. केवळ अक्षर पटेलने चांगली गोलंदाजी करत 4 षटकात केवळ 25 धावा दिल्या. यावेळी चेतन साकरियाने 4 ओव्हरमध्ये 44 धावा देत सर्वाधिक धावा दिल्या.  


हे देखील वाचा-