IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 44 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्सला पाच विकेट्सनं पराभव केला. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये हा सामना पार पडला. या सामन्यात राजस्थानचा तडाखेबाज फलंदाज जोस बटलरनं 67 धावांची खेळी केली. तसेच या सामन्यात त्यानं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात एका षटकात चार षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी कोलकात्याचा फलंदाज पॅट कमिन्सनं अशी कामगिरी केली होती. 


नाणेफेक गमवल्यानंतर राजस्थानच्या संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. या सामन्यात राजस्थानच्या संघानं 20 षटकात मुंबईसमोर 159 धावांचं लक्ष्य ठेवलं. राजस्थानच्या डावातील 16 व्या षटकात हृतिक शॉकीन गोलंदाजी करण्यासाठी आला. या षटकात जोस बटलरनं सलग चार षटकार मारले. या कामगिरीसह आयपीएलच्या यंदाच्या हंगामात एकाच षटकात सलग चार षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत जोस बटलरचा समावेश झालाय.


IPL 2022 मध्ये एका षटकात चार षटकार मारणारा बटलर तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी पॅट कमिन्सनं डॅनियल सॅम्सवर चार षटकार ठोकले होते. तर, ब्रेविसनं राहुल चहरच्या ओव्हरमध्ये षटकार ठोकला. या हंगामात बटलरची कामगिरी पाहिली तर तो प्रभावी ठरला आहे. त्यानं 9 सामन्यात 36 षटकार आणि 47 चौकारांच्या मदतीने 566 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे बटलरनेही या हंगामात आतापर्यंत 3 शतके झळकावली आहेत.


हे देखील वाचा-