Virendra Sehwag on Twitter : मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्यात पुण्याच्या मैदानात प्रेक्षकांना पॅट कमिन्स नावाचं वादळ पाहायला मिळाल. ऐरवी तुफान गोलंदाजी करणाऱ्या पॅटने काल तुफान फलंदाजी करत अवघ्या 15 चेंडूत 56 धावा झळकावत संघाला दमदार विजय मिळवून दिला. दरम्यान मुंबईच्या या सलग तिसऱ्या पराभवानंतर MI चाहते तर निराश झालेच आहेत, त्यात माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने मुंबई इंडियन्सच्या तोंडून 'वडापाव' हिसकावला असं म्हटल्याने फॅन्स आणखीच भडकले. कारण मुंबईचा कर्णधार रोहितला काहीजण सोशल मीडियावर 'वडापाव' म्हणून चिडवत असतात. त्यालाच उद्देशून सेहवाग असं बोलला असल्याचा समज झाल्यानं मुंबई फॅन्स भडकले होते. 



दरम्यान मुंबईच्या फॅन्स भडकल्यानंतर सेहवागने स्वत: त्याच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट देखील केला. तो भडकलेल्या फॅन्सना उद्देशून म्हणाला, 'मुंबईकरांचं सर्वात आवडतं खाणं वडापाव असल्यानं शहराला उद्देशून मी वडापाव म्हणालो आणि रोहित शर्माचा विचार करता मी स्वत: त्याच्या फलंदाजीचा फार मोठा फॅन आहे, कदाचित तुम्हा सर्वांपेक्षा जास्त मोठा.'



मुंबईचा 4 विकेट्सनी विजय


मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा 3 आणि ईशान किशन 14 धावा करुन तंबूत परतले. डी ब्रेव्हिसने मात्र 19 चेंडूत 29 धावांची छोटी पण तुफान खेळी केली. ज्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा 52 आणि 38 धावांची खेळी करत 161 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. मुंबईने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघाची सुरुवात निराशाजनक झाली. कोलकाताने नियमित अंतराने आपल्या विकेट फेकल्या. सलामी फंलदाज अजिंक्य रहाणे 7, कर्णधार श्रेयस अय्यर 10, सॅम बिलिंग्स 17, नितेश राणा 8 आणि आंद्रे रसेल 11 धांवावर बाद झाले. एका बाजूने वेंकटेश अय्यर किल्ला लढवत होता, मात्र दुसऱ्या बाजूला फलंदाज हराकिरी करत होते. त्यामुळे कोलकाता संघ पराभवाच्या छायेत पोहचला होता. मात्र, पॅट कमिन्स याने वादळी खेळी करत मुंबईला विजयापासून दूर ठेवले. पॅट कमिन्सने अवघ्या 15 चेंडूत 56 धावांची वादळी खेळी केली. या खेळीदरम्यान कमिन्सने सहा षटकार आणि चार चौकार लगावले. ज्यामुळे अवघ्या 16 षटकात केकेआरचा विजय पक्का झाला


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha