LSG vs DC : आज आयपीएलमधील 15 वा सामना लखनौ आणि दिल्ली या संघात पार पडणार आहे. आयपीएलमध्ये यंदा नव्याने सामिल झालेला लखनौ संघ आतापर्यंत तरी चांगली कामगिरी करत आहे. 3 पैकी 2 सामने त्यांनी जिंकल्याने ते पाचव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे दिल्ली संघाने आतापर्यंत 2 सामनेच खेळले असून त्यातील एक जिंकला आहे, तर एकात ते पराभूत झाले आहेत. आयपीएलमधील (IPL 2022) या आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडे उत्तम खेळाडूंची फौज असली तरी आज कोणत्या खेळाडूंना अंतिम 11 मध्ये संधी मिळेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


 लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (LSG vs DC) या सामन्यात दोन्ही संघाकडून नक्की कोणते खेळाडू मैदानात उतरतील हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. पण ऑस्ट्रेलियन खेळाडू आता भारतात आले असल्याने दोन्ही संघातील ऑस्ट्रेलियन खेळाडू मैदानात उतरण्याची शक्यता आहे. दरम्यान लखनौकडून मार्कस स्टॉयनिस खेळणार नसला तरी दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर नक्कीच मैदानात उतरु शकतो.


लखनौ संभाव्य अंतिम 11  


केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनिष पांडे, एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, अॅन्ड्रू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान 


दिल्ली संभाव्य अंतिम 11 


पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंह, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर),  ललित यादव, रोवमेन पोवेल, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, मुस्तफिजूर रेहमान.  


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha