LSG vs DC : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (LSG vs DC) या दोन दमदार संघात सामना पार पडणार आहे. दोन्ही संघात अगदी दमदार खेळाडू असल्याने आजचा सामना अटीतटीचा होईल अशी आशा क्रिकेट रसिक व्यक्त करत आहेत. लखनौने आतापर्यंत तीन पैकी दोन सामने जिंकले असून दिल्लीने दोन पैकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे दोन्ही संघाना आजचा विजय गुणतालिकेत झेप घेण्यासाठी महत्त्वाचा आहे.


लखनौ संघात आजही मार्कस स्टॉयनिस खेळणार नसला तरी मागील सामन्यात संघात एन्ट्री झालेला जेसन होल्डर आज काय कमाल करतो का? याकडे अनेकांचे लक्ष आहे. त्यात दिल्ली संघात यंदा उत्तम गोलंदाजी करणाऱ्या कुलदीप यादवकडे दिल्लीवासियांचे लक्ष असेल. 


कधी आहे सामना?


आज 7 एप्रिल रोजी होणारा हा लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha