6 षटकं, 5 गोलंदाज, जेक मॅकगर्कनं सर्वांनाच धू धू धुतलं, बुमराहलाही सोडलं नाही, 15 चेंडूत अर्धशतक
DC vs MI, IPL 2024 : जेक मॅकगर्क यानं मुंबईची गोलंदाजी फोडून काढली. मुंबईने सहा षटकांसाठी पाच गोलंदाजांचा वापर केला.
DC vs MI, IPL 2024 : जेक मॅकगर्क यानं मुंबईची गोलंदाजी फोडून काढली. मुंबईने सहा षटकांसाठी पाच गोलंदाजांचा वापर केला. दिल्लीने पॉवरप्लेमध्ये तब्बल 92 धावा वसूल केल्या. 20 वर्षीय जेक मॅकगर्कनं यानं मुंबईची गोलंदाजी फोडली. त्यानं अवघ्या 15 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलं.
दिल्लीनं 6 षटकानंतर बिनबाद 92 धावा केल्या आहेत. जेक मॅकगर्क 24 चेंडूमध्ये 78 धावांवर खेळथ आहे. त्यानं आपल्या झंझावती खेळीमध्ये पाच षटकार आणि 11 चौकार ठोकले आहेत. त्याला अभिषेक पोरेल यानं चांगली साथ दिली. पोरेल 11 चेंडूत 11 धावांवर खेळत आहे.
सहा षटकांचा लेखाजोखा -
पहिल्या षटकात काय झालं ??
लूक वूड पहिलं षटक घेऊन आला, पण त्याला जेक मॅकगर्क यानं चोपलं. लूक वूडच्या पहिल्या षटकात 19 धावा वसूल करत शानदार सुरुवात केली. 3 चौकार आणि एक षटकार या षटकात दिल्लीने लगावले.
दुसरं षटक -
मुंबईकडून दुसरं षटक बुमराह घेऊन आला..पण दिल्लीच्या फलंदाजांनी समाचार घेतला. बुमराहच्या षटकात 18 धावा वसूल केल्या. या षटकात दोन चौकार आणि एक षटकार दिल्लीने लगावला.
दिल्ली 2 षटकानंतर बिनबाद 37 धावा
तिसरं षटक -
तिसरं षटक नुवान तुषारा घेऊन आला. त्याचीही धुलाई झाली. तुषाराच्या षटकात दिल्लीने 18 धावा वसूल केल्या. या षटकात दिल्लीने चार चौकार ठोकले.
3 षटकानंतर बिनबाद 55 धावा
चौथं षटक -
पियुष चावला चौथं षटक घेऊन आला, पण तोही धावा रोखू शकला नाही. पियूष चावलाच्या षटकात दिल्लीने 14 धावा वसूल केल्या. एक चौकार आणि एक षटकार लगावला.
दिल्ली 4 षटकानंतर बिनबाद 69 धावा...
पाचवं षटक -
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या पाचवं षटक घेऊन आला, पण त्याचीही धुलाई झाली. हार्दिक पांड्याच्या षटकात 20 धावा वसूल करण्यात आल्या. या षटकात दोन षटकार आणि दोन चौकार वसूल करण्यात आले.
दिल्लीनं पाच षटकानंतर बिनबाद 89 धावा केल्या.
सहावं षटक -
जसप्रीत बुमराह सहावं षटक घेऊन आला. बुमराहनं या षटकांमध्ये दिल्लीच्या गोलंदाजांना रोखलं. बुमराहनं या षटकात फक्त तीन धावा दिल्या. पण विकेट घेता आली नाही.
सहा षटकानंतर दिल्ली बिनबाद 92 धावा..
1st over - 19 runs.
— Johns. (@CricCrazyJohns) April 27, 2024
2nd over - 18 runs.
3rd over - 18 runs.
4th over - 14 runs.
5th over - 20 runs.
6th over - 3 runs.
Delhi Capitals smashed 92 runs in the Powerplay with Jake Fraser McGurk 78*(24). 💥 pic.twitter.com/EHQNei2yIS
दिल्ली कॅपिटल्सची Playing XI:
कुमार कुशाग्रा, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, मुकेश कुमार, लिजाद विलिअम्स
इम्पॅक्ट सब - रसीख, दुबे, ओत्सवाल, रिकी भुई, सुमित कुमार
मुंबई इंडियन्सची Playing XI:
रोहित शर्मा, इशान किशन, नेहाल वेढेरा, तिलक वर्मा, नेहाल वढेरा हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी पीयूष चावला, लूकी वूड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा
Potential subs: सूर्यकुमार यादव, नमन धीर, सॅम्स मुलानी, ब्रेविस, कुमार कार्तिकिय