CSK vs SRH, IPL 2023 Live : चेन्नईचा हैदराबादवर सात विकेटने विजय

IPL 2023, Match 29, CSK vs SRH:  सनरायजर्स हैदराबादचा सामना आयपीएलच्या चार वेळच्या विजेत्या चेन्नईसोबत होणार आहे.

नामदेव कुंभार Last Updated: 21 Apr 2023 10:49 PM
चेन्नईचा हैदराबादवर सात विकेटने विजय

चेन्नईचा हैदराबादवर सात विकेटने विजय

रायडू बाद, चेन्नईला तिसरा धक्का

रायडू बाद, चेन्नईला तिसरा धक्का

चेन्नईला दुसरा धक्का, अजिंक्य रहाणे बाद

चेन्नईला दुसरा धक्का, अजिंक्य रहाणे बाद

डेवॉन कॉनवेचे अर्धशतक

डेवॉन कॉनवेचे अर्धशतक

चेन्नईला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड बाद

चेन्नईला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड बाद

हैदराबादची १३४ धावांपर्यंत मजल

हैदराबादची १३४ धावांपर्यंत मजल

हैदराबादला सहावा धक्का

हैदराबादला सहावा धक्का.. क्लासेन बाद

हैदराबादचा अर्धा संघ तंबूत

हैदराबादचा अर्धा संघ तंबूत... मयंक अग्रवाल स्वस्तात तंबूत.. जाडेजाने घेतली तिसरी विकेट

हैदराबादला चौथा धक्का, कर्णधार तंबूत परतला

हैदराबादला चौथा धक्का, कर्णधार तंबूत परतला

जाडेजा ऑ फायर... राहुल त्रिपाठीला केले बाद

जाडेजा ऑ फायर... राहुल त्रिपाठीला केले बाद

जाडेजाने दिला हैदराबादला दुसरा धक्का

जाडेजाने हैदराबादला दुसरा धक्का दिला .... अभिषेक शर्मा याला जाडेजाने तंबूत पाठवले

हैदराबादला पहिला धक्का

हैदराबादला पहिला धक्का बसला आहे. विस्फोटक सलामी फलंदाज हॅरी ब्रूक बाद झालाय

अभिषेक शर्मा-हॅरी ब्रूक सलामीला

अभिषेक शर्मा-हॅरी ब्रूक सलामीला

CSK vs SRH, IPL 2023: चेन्नईची प्रथम गोलंदाजी, हैदराबाद एका बदलासह मैदानावर

CSK vs SRH, IPL 2023: चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नेणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. एडन मार्करमच्या नेतृत्वातील हैदराबाद संघाला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. दव पडण्याची शक्यता असल्याचे धोनीने नाणेफेकीनंतर सांगितले. धोनीने चेन्नईच्या संघात कोणताही बदल केला नाही.. मागील सामन्यातील प्लेईंग ११ खेळवण्याचा निर्णय धोनीने घेतला आहे. दुसरीकडे हैदराबादच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. उमरान मलिक याला संधी देण्यात आली आहे. 

धोनीने नाणेफेक जिंकली

धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला

थोड्याच वेळात नाणेफेक होणार

थोड्याच वेळात नाणेफेक होणार

CSK vs SRH, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

चेन्नई  आणि हैदराबाद (KKR) यांच्यात आज २१ एप्रिल रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल. 

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 29, CSK vs SRH:  सनरायजर्स हैदराबादचा सामना आयपीएलच्या चार वेळच्या विजेत्या चेन्नईसोबत होणार आहे. चेपॉक मैदानावर सामना होणार आहे, येथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करते.. त्यामुळे आज फिरकी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळू शकतो. बेन स्टोक्स तंदुरस्त झाला असून आजच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.. दुखापतीमुळे मागील तीन सामन्यासाठी स्टोक्स उपलब्ध नव्हता... बुधवारी स्टोक्सने सराव सत्रात सहभाग घेतला होता. त्यामुळे आज स्टोक्स उपलब्ध आहे. चेन्नईसाठी ही जमेची बाजू आहे. पण धोनीच्या खेळण्याबाबत संभ्रम आहे.  डेवोन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीची दमदार कामगिरी आणि शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे यांचे आक्रमक रुप चेन्नईला मोठी धावसंख्या उभारून देत आहेत.  पण इतर फलंदाजांकडून योगदान मिळत नाही. 


सनरायजर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सविरोधात पराभवाचा सामना करावा लागला होता. आता ते विजयाच्या पटरीवर परतण्यासाठी सज्ज आहेत. हैदराबादच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. फलंदाज आपली कामगिरी चोख बजावत नाहीत. चेन्नईला घरच्या मैदानावर हरवायचे असल्यास हैदराबादच्या फलंदाजांना आपली कामगिरी चोख बजावावी लागेल. मागील सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी हराकिरी केली होती. पावरप्लेमध्ये विकेट फेकल्या होत्या. हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी,  कालसेन, मार्करम, अभिषेक शर्मा यांना योगदान द्यावे लागेल. सुंदर आणि समद यांन अखेरीस फिनिशिंग टच देण्याची गरज आहे. हैदराबदच्या फलंदाजीत सातत्याची कमी दिसत आहे. आजचा सामन्यात बाजी मारायची असल्यास सांघिक कामगिरी गरजेची आहे.  




 



CSK vs SRH, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
चेन्नई  आणि हैदराबाद (KKR) यांच्यात आज २१ एप्रिल रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल. 


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.









महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), डेवोन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोइन अली, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, सिसंदा मगाला, शिवम दुबे, ड्वेन प्रीटोरियस, अहय मंडल, निशांत सिंधु, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सेंटनर, सुभांशु सेनापती, सिमरजीत सिंह, मथीसा पथिराना, महेश तीक्ष्णा, भगत वर्मा, प्रशांत सोलंकी, शेख रशीद, तुषार देशपांडे 


सनरायजर्स हैदराबाद: 
एडेन मार्कराम (कर्णधार), अब्दुल समद, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को यानसन, वाशिंगटन सुंदर, फजलहक फारूकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन , आदिल राशिद, मयंक मारकंडे, विवरांत शर्मा, समर्थ व्यास, संवीर सिंह, उपेंद्र यादव, मयंक डागर, नीतीश कुमार रेड्डी, अकील होसीन, अनमोलप्रीत सिंह

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.