सोलापूर : जिल्ह्यातील महत्त्वाचा आणि दुष्काळ भाग म्हणून कायम चर्चित राहिलेल्या सांगोला (Sangola) मतदारसंघातही यंदा तिरंगी लढतीची शक्यता आहे. काय झाडी, काय डोंगार आणि काय हाटील म्हणत राज्यभर प्रसिद्धी मिळवेल्या सेलिब्रिटी आमदार शहाजी बापू पाटील यांचा हा मतदारसंघ. मात्र, तत्पूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि दिवंगत गणपत आबा देशमुख यांचा हा मतदारसंघ म्हणून राज्याला ओळख आहे. शेतकरी व कामगारांसाठी लढणारा नेता म्हणून तब्बल 11 टर्म या मतदारसंघातून गणपत देशमुख यांनी प्रतिनिधित्व केलं. मात्र, गत निवडणुकीत प्रकृतीचं कारण देत त्यांनी विधानसभा निवडणुकीत माघार घेतली होती. त्यावेळीही, कार्यकर्त्यांनी अक्षरश: त्यांच्या पायावर डोकं टेकवत त्यांनाच उमेदवारी लढविण्यासाठी आग्रह केला होता. मात्र, गत निवडणुकी त्यांनी नातू अनिकेत देशमुख यांना विधानसभेच्या (Vidhansabha) मैदानात उतरवले होते. यंदा महाविकास आघाडीत ही जागा शेकापला न मिळाल्यास आम्ही लाल बावटा फडकवणार असल्याचा इशाराच अनिकेत देशमुख यांनी दिला होता. कारण, गत विधानसभा निवडणुकीत केवळ 768 मताच्या फरकाने देशमुख यांचा पराभव झाला होता. यंदा बाबासाहेब देशमुख यांना शेकापकडून मैदानात उतरवण्यात आले होते. निवडणूक निकालात 19 व्या फेरीअखेर बाबासाहेब देशमुख यांना 17,121 मतांचं मताधिक्य आहे. देशमुख यांना 97,299 मतं मिळाली असून शहाजी बापू पाटील 17,121 मतांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे, येथील मतदारसंघातून शहाजी बापूंचा पराभव निश्चित मानल जात आहे.
सांगोल्यात शहाजी बापू पाटील सुरुवातीपासूनच पिछाडीवर होते, शेकापचे बाबासाहेब देशमुख आघाडी होते. त्यामुळे दोघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. राज्यात यंदा महायुती व महाविकास आघाडी उदयास आल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वेगळीच रंगत असून जोरदार चुरसही पाहायला मिळणार आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शहाजी बापू पाटील यांचं नाव चर्चेत असून शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे, शहाजी बापू पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अनिकेत देशमुख मैदानात उतरणार की दीपक साळुंखे यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळणार याची जोरदार चर्चा मतदारसंघात रंगली होती. त्यातच, महाविकास आघाडीकडून जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाने बार्शी सोबत सांगोल्याची जागाही मागितली आहे. गेल्यावेळी शिवसेनेचा आमदार असल्याने या जागेवर आमचा हक्क असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यामुळं महाविकास आघाडीला कायम साथ देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची जागा धोक्यात आल्याने कार्यकर्ते संतप्त झाले होते.
गत 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय झालं
सांगोला मतदारसंघ हा पारंपरिक शेतकरी कामगार पक्षाचा राहिला आहे. येथील मतदारसंघात माजी आमदार आणि दिवंगत शेकाप नेते गणपत देशमुख यांनी तब्बल 11 वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा विक्रम केला आहे. मात्र, गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत येथील मतदारसंघातून शिवसेना युतीचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांना विजय मिळाला होता. शहाजी पाटील यांना 99,464 मतं मिळाली असून केवळ 768 मताधिक्यांनी ते आमदार बनले. पाटील यांनी शेकापच्या डॉ. अनिकेत देशमुख यांचा पराभव केला होता. अनिकेत देशमुख हे गणपत देशमुख यांचे नातू असून त्यांचा 2019 ला निसटता पराभव झाला होता. त्यामुळे, यंदाही विधानसभेच्या रणांगणात देशमुख कुटुंबीयांनी आपली ताकद लावली आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या दीपक साळुंखे यांनीही जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळालं.
लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य
धैर्यशील मोहिते पाटील यांना जिल्ह्यातील सांगोला वळगता माढा,पंढरपूर,करमाळा आणि माळशिरस या 4 मतदारसंघातून लीड आहे. त्यामुळेच, धैर्यशील मोहिते पाटील 1,20,837 मतांनी विजयी झाले आहेत. सांगोल मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य मिळालं. सांगोल्यातून जवळपास 4,500 मतांचा लीड निंबाळकर यांना मिळाला आहे. निंबाळकर यांना केवळ सांगोला मतदारसंघातूनच मताधिक्य मिळालं असून येथील मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. काय झाडी, डोंगर, हाटील फेम शहाजीबापू पाटील हे सांगोल्यातून विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे, लोकसभेला त्यांची जादू मतदारसंघात चालली होती, ती आता विधानसभेला चालणार का हेही लवकरच स्पष्ट होईल.
3 लाख 29 हजार मतदार
सांगोला विधानसभा मदारसंघात एकूण 3 लाख 29 हजार 48 मतदारसंख्या आहेत. त्यापैकी, 1 लाख 70 हजार 690 पुरुष मतदार असून 1 लाख 58 हजार 353 स्त्री मतदार आहेत. मतदारसंघातील तृतीयपंथी मतदारांची संख्या 5 एवढी आहे. तसेच, मतदारसंघात एकूण 305 मतदान केंद्रांवर मतदानप्रक्रिया पार पडत आहे.
हेही वाचा
शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?