Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडत आहे. या निवडणूक निकालात भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले आहे. राज्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याचे चित्र आहे. राज्यातील 288 जागांपैकी 299 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर महाविकास आघाडीला केवळ 54 जागांवर विजय मिळवता आला आहे.
कोणता पक्ष किती जागांवर आघाडीवर ?
भाजपने 133 , शिंदेंची शिवसेना 56, अजित पवारांची राष्ट्रवादी 40 जागांवर आघाडी आहे. महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसलाय. काँग्रेस पक्ष केवळ 20 , शरद पवारांच्या राष्ट्रवादी 15 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिलाय.
दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागलेच आहे. पण विशेष म्हणजे काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय.
पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालाय. ते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपचे अतुल भोसले असा सामना रंगला होता. या लढतीत अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव केला आहे. कराड दक्षिणमध्ये 17 व्या फेरीनंतर अतुल भोसले यांनी 38 हजार मतांचा लिड मिळवला होता. पृथ्वीराज चव्हाण यांना हा लीड तोडण्यात अपयश आलंय.
यशोमती ठाकूर यांचाही पराभव
माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपने यशोमती ठाकूर यांच्याविरोधात राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिली होती. राजेश वानखेडे यांच्याकडे 21 फेऱ्यांनंतर 8195 मतांचा लीड होता. अखेर आता यशोमती ठाकूर यांचा पराभव झाल्याचे निश्चित मानले जात आहे.
बाळासाहेब थोरात यांचा देखील पराभव
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. बाळासाहेब थोरात सातत्याने या मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, यावेळी मतदारांनी त्यांचा आमदार बदलला आहे. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून अमोल खटाळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. अमोल खटाळ यांनी थोरातांचा 10 हजार 560 मतांनी पराभव केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या