एक्स्प्लोर

CSK vs RCB: IPL 2024: सामना कधीही फिरवण्याची क्षमता; सीएसके अन् आरसीबीच्या सामन्यात 5 खेळाडूंवर सर्वांची नजर

CSK vs RCB Score Live IPL 2024: सीएसके विरुद्ध आरसीबी सामन्यात ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या असतील अशा खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.

CSK Vs RCB: IPL 2024: Latest Marathi News: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात 22 मार्च रोजी IPL 2024 च्या पहिल्या सामन्यात सामना होणार आहे. दोन्ही संघात स्टार खेळाडूंची कमतरता नाही, त्यामुळे एमए चिदंबरम स्टेडियमवर प्रेक्षणीय सामन्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही. विराट कोहली ते ग्लेन मॅक्सवेल आणि महेंद्रसिंग धोनी आणि इतर स्टार खेळाडू आपले सर्वोत्तम देण्यास तयार असतील. सीएसके विरुद्ध आरसीबी सामन्यात ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या असतील अशा खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.

1. विराट कोहली

विराट कोहली 2008 पासून इंडियन प्रीमियर लीगचा भाग आहे आणि 2010 पासून, विराट कोहलीने 300 पेक्षा कमी धावा केल्या असतील असा एकही हंगाम नाही. गेल्या मोसमातही त्याने 14 सामन्यांत 53.25 च्या सरासरीने 639 धावा केल्या होत्या. डावाची सुरुवात संथपणे करायची आणि शेवटी आक्रमक फलंदाजी करून सामन्याचा मार्ग बदलण्याची कोहलीची सवय झाली आहे. सीएसकेविरुद्धच्या सामन्यातही कोहलीची खेळी महत्त्वाची ठरू शकते.

2. ग्लेन मॅक्सवेल

ग्लेन मॅक्सवेलची बहुतेक क्रिकेट कारकीर्द पांढऱ्या चेंडूच्या फॉर्मेटला समर्पित राहिलेली आहे. मॅक्सवेलचे आकडे मधल्या फळीतील फलंदाज म्हणून उत्कृष्ट आहेत. केवळ फलंदाजीतच नाही तर गोलंदाजी करुन सामना फिरवण्याची क्षमता ग्लेन मॅक्सवेलमध्ये आहे. आयपीएल 2023 मध्ये, त्याने 14 सामन्यांमध्ये 400 धावा केल्या होत्या आणि त्याच्या आयपीएल कारकीर्दीत 31 विकेट्स देखील घेतल्या होत्या.

3. ऋतुराज गायकवाड

ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2023 मध्ये 16 सामने खेळताना 590 धावा केल्या होत्या आणि यावेळी त्याच्याकडून पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी अपेक्षित आहे. आयपीएल 2024 मध्ये सर्वांच्या नजरा त्याच्यावर असतील कारण एमएस धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडले आहे आणि संघाची कमान ऋतुराज गायकवाडकडे सोपवली आहे. गायकवाड केवळ बॅटनेच सामन्याचा मार्ग बदलू शकत नाही, तर यावेळी तो आपल्या कर्णधारपदाच्या जोरावर तसे करू शकतो.

4. रचिन रवींद्र

आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 दरम्यान रचिन रवींद्र पहिल्यांदाच प्रसिद्धीच्या झोतात आला. विश्वचषकात 10 सामन्यात 578 धावा करण्यासोबतच फिरकी गोलंदाजी करताना 5 विकेट्सही घेतल्या. चेन्नई सुपर किंग्जने त्याला आयपीएल 2024 च्या लिलावात 1.8 कोटी रुपयांना विकत घेतले आहे आणि तो या वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण करणार आहे. डेव्हॉन कॉनवेच्या अनुपस्थितीत रचिन ऋतुराज गायकवाडसोबत ओपनिंग करताना दिसणार आहे. 

5. मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराज हा आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा मुख्य वेगवान गोलंदाज असेल. गेल्या मोसमात खेळलेल्या 14 सामन्यांत त्याने 19 विकेट घेतल्या होत्या. विशेषत: नव्या चेंडूने मोहम्मद सिराज चेन्नईच्या फलंदाजांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवू शकतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BCCI Rule For Team India : रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali khan Attracker: सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशनच्या CCTV मध्ये कैद, घटनेनंतर वसई-विरारला रवानाSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खाजगी वॉर्डात शिफ्ट करणारSSomnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदतBandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI Rule For Team India : रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Embed widget