CSK vs RCB: रवींद्र जडेजाचं षटकारांचं शतक पूर्ण, सिक्सर मारणाऱ्यांच्या यादीत पहिलं कोण? रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी
Ravindra Jadeja : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नईनं रवींद्र जडेजा आणि शिवम दुबेच्या भागिदारीच्या जोरावर विजय मिळवला. या मॅचमध्ये रवींद्र जडेजानं एक विक्रम आपल्या नावावर केला.
Ravindra Jadeja IPL 2024: रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja ) ने चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) साठी चांगली कामगिरी करत चेन्नई विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये टीमला विजय मिळवून दिला. रवींद्र जडेजानं 25 धावा केल्या. आयपीएलच्या 2024 च्या पर्वातील पहिली मॅच चेन्नईच्या चेपॉकवर खेळवली गेली. यामध्ये चेन्नईनं आरसीबीला (Royal Challengers Bengaluru) सहा विकेटनं पराभूत केलं. रवींद्र जडेजानं या मॅचमध्ये आपल्या नावावर एक विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये त्यानं 100 सिक्स मारले आहेत.आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्यांच्या यादीत दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
रवींद्र जडेजानं आयपीएलमध्ये आतापर्यंत 227 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये जडेजानं 2717 धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजाची आयपीएलमधील सर्वधिक धावसंख्या 62 इतकी आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात त्यानं 16 मॅचमध्ये 9 सिक्स मारले होते. जडेजानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या मॅचमध्ये षटकारांचं शतक पूर्ण केलं. त्यानं या मॅचमध्ये 17 बॉलमध्ये 25 धावा केल्या. या खेळीत जडेजानं एक सिक्स मारला होता.
Rockstar sends it to the skies an 💯 times! 🔥🤩#CSKvRCB #WhistlePodu 🦁 @imjadeja pic.twitter.com/5mmP5RrLCx
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 23, 2024
आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स कुणाच्या नावावर?
आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचं रेकॉर्ड वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेल याच्या नावावर आहे. रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. ख्रिस गेलनं 142 मॅचमध्ये 357 षटकार मारले आहेत. रोहित शर्मानं 243 मॅचमध्ये 257 षटकार मारले आहेत.एबी डिव्हिलियर्स या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानं 184 मॅचमध्ये 251 षटकार मारले आहेत. महेंद्रसिंह धोनी हा सिक्स मारणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. धोनीनं 251 मॅचमध्ये 239 सिक्स मारले आहेत. विराट कोहली हा या यादीत पाचव्या स्थानावर आहे. विराटनं 238 मॅचमध्ये 235 षटकार मारले आहेत.
आयपीएल 2024 ची सुरुवात झालेली आहे. पहिल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला आहे. सध्या आयपीएलची दुसरी लढत पंजाब आणि दिल्ली यांच्यात सुरु आहे. यानंतर तिसरी मॅच कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. चेन्नईची दुसरी लढत गुजरात टायटन्स सोबत होणार आहे. ही मॅच 26 मार्चला होणार आहे.
चेन्नईची विजयी सलामी
आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिली मॅच चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील लढतीनं झाली. आरसीबीनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताल होता. आरसीबीनं 20 ओव्हरमध्ये चेन्नईपुढं 174 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईनं आरसीबीनं दिलेलं आव्हान सहजरित्या पार केलं. चेन्नईनं 4 विकेट गमावून आरसीबीनं दिलेलं आव्हान पूर्ण केलं. चेन्नई सुपर किंग्जनं सांघिक कामगिरीच्या जोरावर पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवला.
संबंधित बातम्या :
कमिन्स vs स्टार्क, ऑस्ट्रेलियाचे दिग्गज आमनेसामने, KKR vs SRH यांच्यातील संभाव्य प्लेईंग 11