IPL 2023 Final, Ahmedabad : आयपीएल 2023 मध्ये रविवारी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील अंतिम सामना होऊ शकला नाही. पावसामुळे रविवारी सामना होऊ शकला नाही, त्यामुळे चाहत्यांच्या उत्साहाला विरजण लागलं. पण, चांगली बाब म्हणजे आता हा सामना सोमवारी खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. आता सोमवारी चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम सामन्याचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे, मात्र सोमवारी अहमदाबादमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात  आली आहे. 


अहमदाबादेत ऊन-पावसाचा खेळ


अहमदाबादमध्ये रविवारी रात्री पाऊस थांबला असून आज सकाळपासून ऊन पडलं आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये सोमवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. accuweather संकेतस्थळावरील माहितीनुसार, अहमदाबादमध्ये सोमवारी ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये संध्याकाळी सहा ते 10 वाजेदरम्यान अहमदाबादमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. संकेतस्थळानुसार, संध्याकाळी सात ते दहा वाजता पावसाची शक्यता आठ टक्के वर्तवण्यात आली आहे.






आजचा सामना रद्द झाल्यास गुजरातकडे विजेतेपद


आज पुन्हा एकदा पावसामुळे राखीव दिवसाच्या सामन्यात व्यत्यय आल्यास म्हणजेच 'रिझर्व्ह डे'वर परिणाम झाला आणि सामना होऊ शकला नाही, तर यामुळे चेन्नईचे नुकसान होईल. मीडिया रिपोर्टनुसार, 'रिझर्व्ह डे'ला म्हणजेच आजही सामना न झाल्यास गुणतालिकेतील पहिल्या क्रमांकावरील संघ विजेता ठरेल. यानुसार गुजरात टायटन्सला यंदाच्या मोसमाचा विजेता घोषित करण्यात येईल, असं झाल्यास चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाचं मोठं नुकसान होणार आहे.


59 दिवस आणि 74 सामने, आज ठरणार महाविजेता


इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) यंदाच्या सोळाव्या मोसमात फक्त एकमेव सामना शिल्लक आहे. आयपीएल 2023 चा हा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात रंगणार आहे. यंदाच्या आयपीएलमधील हा 74 वा सामना असेल. 31 मार्च रोजी धूमधडाक्यात या स्पर्धेला सुरुवात झाली. 59 दिवस आणि 73 सामन्यानंतर आज आयपीएल 2023 मधील विजेता मिळणार आहे. चार वेळा विजेता चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गतविजेता गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ आज रणसंग्रामासाठी सज्ज झाले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 Final : चेन्नई उपविजेता? अहमदाबादच्या मैदानावरील फोटो व्हायरल