IPL 2023 Final CSK vs GT : आयपीएल 2023 चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार होता. रविवारी पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. सोमवारी आयोजित करण्यात येणार आहे. सोमवारी राखीव दिवशी आता आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात पहिल्यांच असं घडत आहे की, आयपीएलचा अंतिम सामना राखीव दिवशी खेळवला जाणार आहे.


आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा राखीव दिवशी अंतिम सामना


गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण, सततच्या पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आणि आता सोमवारी हा सामना रंगणार आहे. रविवारचा सामना रद्द करण्याचं कठोर पाऊल उचलण्यापूर्वी पंचांनी प्रत्येक संभाव्य परिस्थितीचा विचार केला. मात्र, अखेर रविवारी खेळ होऊ शकला. आता हा सामना 29 मे रोजी राखीव दिवशी होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा राखीव दिवशी अंतिम सामना पार पडणार आहे.




अंतिम सामन्यावर पुन्हा पावसाचं सावट


रविवारी झालेल्या पावसामुळे अहमदाबादमधील (Ahmedabad Rain) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यातील आयपीएल 2023 चा अंतिम सामना (IPL 2023 Final ) होऊ शकला नाही. त्यामुळे हा सामना आज, सोमवारी राखीव दिवशी खेळवला जाणार  रविवारी पावसानं प्रेक्षकांची निराशा केली. आज 29 मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यावरही पावसाचं सावट आहे.


सोमवारीही सामना रद्द झाल्यास विजेता कोण ठरणार?


आयपीएल 2023 चा अंतिम सामना सोमवारी, 29 मे रोजी राखीव दिवशीही होऊ शकला नाही, तर गुजरात टायटन्स संघाला याचा फायदा होईल. आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये सध्या गुजरात टायटन्स संघ अव्वल आहे.सोमवारीही महाअंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्यास साखळी सामन्यानंतर आयपीएल गुणतालिकेतील (IPL 2023 Points Table) पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या संघाला महाविजेता म्हणून घोषित केलं जाईल.  त्यामुळे सोमवारी अंतिम सामना न झाल्यास गुजरात टायटन्स आयपीएल 2023 चा विजेता ठरेल. चेन्नई सुपर किंग्स संघाला याचं नुकसान सहन करावं लागेल, कारण चेन्नई पॉईंट्स टेबलवर दुसऱ्या क्रमांकावर आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 Final : चेन्नई उपविजेता? अहमदाबादच्या मैदानावरील फोटो व्हायरल