GT vs CSK, IPL 2023 Final : आयपीएल 2023 चा महामुकावला रविवारी पावसामुळे स्थगित झाला. अंतिम सामना आज, 29 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता खेळवण्यात येणार आहे. अहमदाबादमध्ये आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात ब्लॉकबस्टर लढत पाहायला मिळणार आहे. रविवारी पावसानं क्रिकेट चाहत्यांची निराशा केली. त्यानंतर आता सोशल मीडियावर व्हायरल पोस्टनं चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.


IPL 2023 Final : आयपीएल 2023 चा चेन्नई उपविजेता? 


अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर मोठ्या स्क्रीनवर चेन्नई (CSK) ला आयपीएल 2023 चे उपविजेता घोषित करणारा फोटो सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर यो फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आधीच पावसामुळे हिरमोड झालेले चेन्नई सुपर किंग्सचे चाहते या फोटोमुळे चकित झाले आहेत. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर या फोटोवर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.


अहमदाबादच्या मैदानावरील फोटो व्हायरल


पावसामुळे लांबलेला आयपीएलचा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघाला उपविजेते घोषित करणारा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिसून येत आहे की, नरेंद्र मोदी स्टेडिअममधील एका मोठ्या स्क्रिनवर चेन्नई सुपर किंग्स उपविजेते असा मजकूर दिसत आहे. दरम्यान, या फोटो प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिलं, "हे खरं आहे की ते फक्त सिस्टम तपासत आहेत?" दुसर्‍याने लिहिलं, "हे खरं आहे का?" आणखी एका युजरने ट्विट करत म्हटलं आहे की, "हे नक्कीच स्क्रीन टेस्टिंग करत आहेत."


 






CSK vs GT IPL 2023 Final : कोण ठरणार स्पर्धेचा महाविजेता?



CSK vs GT IPL 2023 Final : आज 29 मे रोजी आयपीएल 2023 चा महामुकाबला (IPL 2023 Final) चेन्नई आणि गुजरात (GT vs CSK) यांच्यात रंगणार असून या स्पर्धेचा महाविजेता आज ठरणार आहे. 28  मे रोजी अंतिम सामना स्थगित झाला होता.



Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : गिल, शमी, जडेजा आणि रहाणे अंतिम सामन्याला मुकणार?, सोशल मीडियावरील 'ते' ट्विट व्हायरल