एक्स्प्लोर

IPL 2023 Final : खेळ पावसाचा! फायनलआधी गुजरातमध्ये धो धो, आज सामना झाला नाही तर विजेता कोण?

IPL 2023 Final : अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.  

CSK vs GT Final IPL 2023: चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये फायनलचा थरार रंगणार आहे. पण अहमदाबादमध्ये सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे.  पावसामुळे सामन्याला उशीरा सुरुवात होण्याची शक्यता आहे. पण आज जर पाऊस थांबलाच नाही, तर आयपीएलकडून काही नियम तयार करण्यात आलेले आहे. आज जर कमीत कमी पाच षटकारांचा सामना झाला नाही. तर रिझर्व डेला सामना होणार आहे.  

रिझर्व डे सोमवारी ठेवण्यात आला आहे. आजही एकही चेंडू पडला नाही, तर फायनलचा थरार उद्या पाहायला मिळणार आहे. पण सोमवारीही पाऊस पडला तर विजेता कोण होणार ...याची उत्सुकता लागली आहे. जर सोमवारी पावसामुळे सामना झाला नाही.. गुजरातला विजेता घोषित करण्यात येणार... कारण, साखळी फेरीत गुजरातचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. 

पावसामुळे सामना रद्द झाल्यास पुढे काय?
याशिवाय पावसामुळे सामन्यात विलंब झाल्यास आवश्यक 20 षटकांपैकी काही षटकांची संख्या कमी केली जाण्याचीही शक्यता आहे. यानुसार, प्रत्येक संघाला किमान पाच षटके फलंदाजी करण्याची संधी मिळेल. आजच्या सामन्यासाठीची शेवटची वेळ रात्री 12.26 वाजता असेल, त्यानंतरही सामना न झाल्यास हा सामना सोमवारी खेळवण्यात येईल. सोमवारीही पावसाने ख्वाडा घातल्यास गुजरातचा संघ विजेता होईल. 

आजची रात्र आयपीएल फायनलची?

अहमदाबादच्या पावसाचा आयपीएल फायनलला तडाखा बसलाय. फायनल सुरु होण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. पावसानं आजच्या दिवसावर पाणी फेरलं तर फायनलसाठी उद्याचा दिवस राखीव आहे. रात्री ९.३५ वाजेपर्यंत खेळ सुरु झाला तर फायनल २०-२० षटकांची होणार आहे. रात्री ९.३५ वाजल्यानंतर खेळ सुरु झाला तर फायनलची षटकं कमी होणार आहेत. रात्री ११.५६ वाजता खेळ सुरु झाला तर फायनल पाच-पाच षटकांची होणार आहे. आज खेळ सुरु झाल्यावर पुन्हा पाऊस आल्यास उर्वरित सामना राखीव दिवशी होईल. 

आयपीएलच्या सोळाव्या मोसमाचा विजेता कोण?

धोनीची चेन्नई सुपर किंग्स, की हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स या प्रश्नाचं उत्तर काही तासांत मिळणार आहे.. यंदाच्या मोसमात दोन्ही फौजा तिसऱ्यांदा आमनेसामने उभ्या ठाकतील. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीतला कदाचित हा अखेरचा आयपीएल सामना ठरण्याची शक्यता आहे..त्यामुळं चेन्नईचे शिलेदार धोनीला विजेतेपदाची भेट देण्याचा निकरानं प्रयत्न करतील. दरम्यान, गुजरात टायटन्सनं लागोपाठ दुसऱ्या वर्षी आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारलीय. आयपीएलच्या गत मोसमात गुजरातनं राजस्थान रॉयल्सला नमवून विजेतेपद पटकावलं होतं..यंदा त्या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याचा गतविजेत्या गुजरातचा प्रयत्न राहिल. पण यंदा गुजरातसमोर चारवेळा आयपीएल जिंकणाऱ्या चेन्नईचं तगडं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नई आणि गुजरात संघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget