CSK Vs DC: चेन्नईचा दिल्लीवर 91 धावांनी विजय, वाचा सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे
CSK Vs DC: चेन्नईकडून मोईन अली Moeen Ali), सिमरजीत सिंह (Simarjeet Singh) आणि मुकेश चौधरीनं (Mukesh Choudhary) उत्कृष्ट गोलंदाजी केली.
CSK Vs DC: चेन्नईच्या (Chennai Super Kings) भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीच्या (Delhi Capitals) संघाची दमछाक झाली. मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघानं 91 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं सलामीवीर डेव्हॉन कॉनवेच्या (Devon Conway) आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दिल्लीसमोर 20 षटकात 209 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 117 धावांवर ऑलआऊट झाला. चेन्नईकडून मोईन अली Moeen Ali), सिमरजीत सिंह (Simarjeet Singh) आणि मुकेश चौधरीनं (Mukesh Choudhary) उत्कृष्ट गोलंदाजी केली.
चेन्नई-दिल्ली सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे-
- नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीच्या संघानं चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं.
- चेन्नईचे सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाडनं चेन्नईच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली.
- डेव्हॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाडनं यांच्यात पहिल्या विकेट्ससाठी 110 धावांची भागेदारी केली.
- डेव्हॉन कॉन्वेच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईच्या संघानं 20 षटकात दिल्लीसमोर 209 धावांचं लक्ष्य ठेवलं.
- दिल्लीकडून नॉर्टिजेनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, खलील अहमदनं दोन आणि मिचेश मार्शनं एक विकेट्स घेतली.
- चेन्नईनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाची दमछाक झाली.
- दिल्लीच्या डावातील दुसऱ्याच षटकात डेव्हिड वार्नरच्या रुपात महेश तिक्षणानं दिल्लीला पहिला झटका दिला.
- त्यानंतर मोईन अली, सिमरनजीत सिंह, मुकेश चौधरी आणि ड्वेन ब्राव्होच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.
- दिल्लीच्या संघ 20 षटकात 117 धावांवर आऊट झाला.
- चेन्नईकडून मोईन अलीनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, सिमरनजीत, महेश तिक्षणा, आणि ड्वेन ब्राव्हो यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, महेश तिक्षणाला एक विकेट मिळाली.
हे देखील वाचा-