County Championship 2022: भारतीय संघातून वगळलेल्या चेतेश्वर पुजाराचा इंग्लंडमध्ये धुमाकूळ, पदार्पणाच्या सामन्यात झळकावलं दुहेरी शतक
County Championship 2022: कसोटी क्रिकेटमधील खराब फॉर्ममुळं भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराला भारतीय संघातून बाहेर पडावं लागलं होतं.
County Championship 2022: कसोटी क्रिकेटमधील खराब फॉर्ममुळं भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराला भारतीय संघातून बाहेर पडावं लागलं. मात्र, काऊंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन दोनमधील एका सामन्यात ससेक्सकडून खेळताना त्याने शानदार द्विशतक झळकावलं. तसेच संघाचा पराभव टाळण्यातही तो यशस्वी ठरला आहे. महत्वाचं म्हणजे, भारतीय संघाला जुलैमध्ये इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळायचा आहे. जर पुजारानं तिथंही आपला फॉर्म कायम ठेवला तर, पुन्हा एकदा त्याचं भारतीय कसोटी संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चेतेश्वर पुजारानं इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 2 च्या चालू हंगामातील पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावलं. ससेक्सनं डर्बीशायरविरुद्ध फॉलोऑन खेळून सामना अनिर्णित ठेवण्याच्या आशा कायम ठेवल्या.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आलेल्या पुजारानं 248 चेंडूंत 16 चौकारांच्या मदतीनं 115 धावा केल्यावरही तो क्रीजवर राहिला. त्यानं कर्णधार आणि सलामीवीर टॉम हेन्स (नाबाद 205, 386 चेंडू, 20 चौकार) सोबत तिसऱ्या विकेटसाठी अखंड 232 धावांची भागीदारी केल्यामुळं ससेक्सनं दुसऱ्या डावात 2 बाद 377 अशी 46 धावांची आघाडी घेतली आहे.
चेतेश्वर पुजाराचं फर्स्ट क्लास कारकिर्दीतील हे 51 वे शतक आहे. या सामन्यापूर्वी त्याने 226 सामन्यांच्या 374 डावांमध्ये 51 च्या सरासरीनं 16948 धावा केल्या होत्या. या कामगिरीसह पुजारानं 17 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. यात 50 शतक आणि 70 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं 352 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. त्यानं भारतासाठी 95 सामन्यात 44 च्या सरासरीने 6713 धावा केल्या आहेत. ज्यात 18 शतके आणि 32 अर्धशतक आहेत. त्यानं 50 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यानं भारतासाठी नाबाद 206 धावांची सर्वोत्तम खेळी केली आहे.
हे देखील वाचा-
- RCB vs DC: विराटनं एका हातान झेल पकडल्यानंतर अनुष्कानं दिली 'अशी' प्रतिक्रिया, व्हिडिओ होतोय व्हायरल
- PBKS vs SRH, IPL 2022: हैदराबादविरुद्ध सामन्यात शिखर धवन पंजाबचा कर्णधार; मयांक अग्रवाल संघाबाहेर, नेमकं कारण काय?
- Shane Watson on Mumbai Indians: ईशान किशनवर 15 कोटी खर्च करणं मुंबईची सर्वात मोठी चूक- शेन वॉटसन