एक्स्प्लोर

Sanju Samson : संजू सॅमसन राजस्थानचं कर्णधारपद सोडून आला, चेन्नईनं ट्वीट करत जाहीर केलं टीमचं नेतृत्त्व कोण करणार?

Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएलच्या 19 व्या हंगामासाठी रिटेन केलेल्या खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर केली आहे.

चेन्नई : आयपीएलमधील सर्व संघांनी रिटेन केलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. राजस्थान रॉयल्सचं कॅप्टनपद सोडून संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्जमध्ये दाखल झाला आहे. चेन्नईनं संजू सॅमसनला 18 कोटी रुपयांमध्ये ट्रेड केलं. याचं कारणं गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्सनं संजू सॅमसनला 18 कोटींमध्ये रिटेन केलं होतं. संजू सॅमसनच्या बदल्यात चेन्नईनं रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना राजस्थानकडे पाठवलं. रवींद्र जडेजा 14 कोटी आणि सॅम करनसाठी 2.4  कोटी रुपये राजस्थान रॉयल्सनं मोजले. संजू सॅमसन राजस्थानचं कर्णधार पद सोडून आल्यानं चेन्नईचं कर्णधारपद कोणाकडे  अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. चेन्नईनं एक पोस्ट करत सर्व स्पष्ट केलं आहे. 

Chennai Super Kings Captain : चेन्नईचा कॅप्टन कोण?

चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद गेल्या दोन हंगामापासून ऋतुराज गायकवाडकडे आहे. गेल्या हंगामात ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्यानं महेंद्रसिंह धोनीला कर्णधारपद भूषवावं लागलं होतं. आता चेन्नई सुपर किंग्जके संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सची साथ सोडून आला आहे. संजू सॅमसन राजस्थानचा कॅप्टन होता. त्यामुळं चेन्नईचं नेतृत्त्व त्याच्याकडे जाणार का अशा चर्चा होत्या. मात्र, चेन्नई सुपर किंग्जनं टीमचं नेतृत्त्व ऋतुराज गायकवाड करणार हे स्पष्ट केलं आहे.  चेन्नई सुपर किंग्जला एका विकेटकीपर बॅटसमनची आवश्यकता होती, त्यामुळं त्यांनी संजू सॅमसनला ट्रेड करुन संघात घेतलं आहे. फलंदाजीमध्ये जेव्हा टीमला महेंद्रसिंह धोनीची गरज पडेल तेव्हा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून धोनी फलंदाजीसाठी मैदानावर उतरु शकतो. 

संजू सॅमसन आयपीएलमध्ये 2012 मध्ये केकेआरमध्ये होता मात्र तो एकही सामना खेळला नाही. त्यानंतर राजस्थान रॉयल्सनं संजू सॅमसनला संधी दिली.  पुढच्या काळात राजस्थानवर बंदी आली तेव्हा संजू सॅमसन दिल्ली डेअरडेविल्स संघातून खेळला. पुन्हा 2018 मध्ये संजू राजस्थानमध्ये आला. 2021 पासून 2025 पर्यंत संजू राजस्थानचा कॅप्टन होता. 2022 मध्ये त्यानं राजस्थानला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. आता संजू सॅमसन चेन्नईकडून खेळणार आहे.

CSK ची रिटेन्शन यादी: एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड़, संजू सॅमसन (ट्रेड), शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेविस, आयुष म्हात्रे, उर्विल पटेल, शिवम दुबे, रामकृष्ण घोष, जेमी ओवर्टन, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, नाथन एलिस, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंह

CSK रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी: राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, शेख रशीद, रचिन रवींद्र, विजय शंकर, कमलेश नागरकोटी, मथीशा पाथिराना

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जकडे मिनी ऑक्शनसाठी 43.4 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्या पैशातून मिनी ऑक्शनमध्ये चेन्नई आणखी नऊ खेळाडूंना संघासोबत जोडून घेईल.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget