IPL 2022 : सहा पराभवानंतरही चेन्नई प्लेऑफमध्ये पोहचणार? पाहा समीकरण
चेन्नईला आठ सामन्यात सहा पराभव स्विकारावे लागेत. आठ सामन्यात सहा पराभव झाल्यानंतर चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहचणार का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
Chennai Super Kings, IPL 2022 : पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरणारा मुंबईचा संघाचे आयपीएलच्या 15 व्या हंगामातील आव्हान संपुष्टात आलेय. लागोपाठ आठ सामने गमावल्यानंतर मुंबईचं आव्हान संपुष्टात आलेय. आयपीएलमधील दुसरा सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नईसाठीही यंदाची आयपीएल खराब झाली आहे. चेन्नईला आठ सामन्यात सहा पराभव स्विकारावे लागेत. आठ सामन्यात सहा पराभव झाल्यानंतर चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहचणार का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
चेन्नई सुपरकिंग्सला आठ सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आलेत. नेटरनेटही -0.538 इतका खराब आहे. चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. चेन्नईचे सहा सामने बाकी आहेत. चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहचण्याची किती संधी आहे? पाहूयात काय असेल समीकरण....
सर्व सामन्यात विजय गरजेचा -
रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वातील चेन्नई संघ चार गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. चेन्नईने उर्वरित सहाही सामने जिंकल्यास प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्यासाठी चेन्नईला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल, कारण नेटरनरेट -0.538 इतका खराब आहे. चेन्नईला इतर संघाच्या सामन्यावरही लक्ष ठेवावं लागणार आहे..
16 गुणांसह प्लेऑफमध्ये जाण्यास पात्र -
चेन्नईने उर्वरित सहा सामने चांगल्या फरकाने जिंकले तर प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतो. प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी 16 गुण असणे गरजेचं आहे. जर चार संघापेक्षा जास्त संघाचे गुण 16 असतील तर नेटरनरेटच्या आधारावर पहिल्या चार संघाना निवडले जाते. त्यामुळे चेन्नईला नेटरनरेटवरही लक्ष ठेवावं लागेल. त्याशिवाय इतर संघाच्या निकालाकडेही लक्ष ठेवावं लागेल.
चेन्नईसह मुंबईला आयपीएलचा यंदाचा हंगाम निराशाजनक राहिलाय. आयपीएलमधील सर्वात यशस्वी असणाऱ्या चेन्नई आणि मुंबईला विजयासाठी तरसावे लागलेय. दोन्ही संघाची सुरुवात खराब झाली आहे. मुंबईचे स्पर्धेतील आव्हान संपलेय. मुंबईला आतापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे गुणतालिकेत ते तळाशी आहेत. त्यांची पाटी अद्याप कोरीच आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई आयपीएलच्या 15 व्या हंगामात बाहेर जाणारा पहिला संघ ठरलाय.