एक्स्प्लोर

IPL 2023 : आयपीएलच्या पुढील हंगामात बांगलादेशचे खेळाडूंवर येणार बंदी? वाचा नेमकं प्रकरण काय?

Bangladeshi Players : बांग्लादेशी क्रिकेटपटू आयपीएल 2023 च्या काही सामन्यांत उपस्थित राहणार नसून बांग्लादेश क्रिकेट बोर्डच्या या कृतीमुळे  BCCI नाराज आहे.

Bangladeshi Players, IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) सुरू होण्यापूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या काही कृती बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझींना आवडलेल्या नाहीत, अशा परिस्थितीत या दोन देशांच्या खेळाडूंवर आयपीएल 2024 म्हणजेच पुढच्या हंगामात बंदी घातली जाऊ शकते. या दोन्ही देशांनी आयपीएल दरम्यान आपापल्या द्विपक्षीय मालिका ठेवल्या आहेत, ज्यामुळे आयपीएल संघाचा भाग असलेले अनेक खेळाडू काही दिवस फ्रँचायझीपासून दूर राहणार आहेत.

IPL 2023 मध्ये शाकिब अल हसन, लिटन दास आणि मुस्तफिजुर रहमान यांच्यासह फक्त तीन बांगलादेशी खेळाडू असतील आणि तिन्ही खेळाडू 9 एप्रिल ते 5 मे आणि पुन्हा 15 मे या कालावधीत त्यांच्या संबंधित IPL संघांसाठी उपलब्ध असतील. याशिवाय चारपैकी तीन श्रीलंकेचे खेळाडू 8 एप्रिलनंतरच आयपीएलसाठी उपलब्ध होतील. त्यात वनिंदू हसरंगा, मथिशा पाथीराना आणि महेश तिक्षाना हे खेळाडू आहेत. 8 एप्रिलपर्यंत श्रीलंका न्यूझीलंड दौऱ्यावर असणार आहे.

'भविष्यात बांगलादेशी खेळाडूंबद्दलचा समज बदलेल'

'इनसाइड स्पोर्ट्स'शी बोलताना फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याने सांगितले, “जे आहे, तेच आहे. आम्ही तक्रार करू शकत नाही कारण बीसीसीआयच इतर बोर्डांशी चर्चा करते. पण, आता फ्रँचायझी ठराविक देशांतील खेळाडूंना निवडण्यापूर्वी थोडा विचार करेल. बघितलं तर तस्किन अहमदला एनओसी मिळाली नाही. त्यांना त्यांच्या खेळाडूंना खेळवायचे नसेल तर त्यांनी नोंदणी करू नये. साहजिकच बांगलादेशी खेळाडूंबाबतचा विचार भविष्यात बदलेल.''

स्थानिक मीडियाशी बोलताना बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल म्हणाले, “मला या विषयावर वारंवार विचारण्यात आले आणि मी तेच उत्तर दिले आहे. आयपीएल लिलावासाठी बोलावले जाण्यापूर्वी आयपीएल अधिकाऱ्यांनी आम्हाला खेळाडूंच्या उपलब्धतेबद्दल विचारले आणि आम्ही त्यांना वेळापत्रक दिले. हे जाणून त्यांनी लिलाव पुढे केला. बांगलादेशच्या सामन्यांसाठी त्याच्याकडे उपलब्ध नसण्याचा पर्याय आहे असे मला वाटत नाही. आम्ही विचार करू, असे त्यांना सांगितले.''

सर्व काही खेळाडूंवर अवलंबून

हा सर्व मुद्दा लक्षात घेऊन बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “आपल्या बोर्डाला पटवणे हे पूर्णपणे खेळाडूंवर अवलंबून आहे. इंग्लंड, न्यूझीलंड आणि इतर प्रमुख मंडळांनी यासाठी मार्ग काढला आहे. आयपीएलची लोकप्रियता कोणीही नाकारू शकत नाही आणि खेळाडूंना सोडवून बोर्डालाही त्यांचा वाटा मिळतो. परंतु त्यांनी दुसरा काही निर्णय घेतल्यास, ते त्यांच्यावर आहे.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
Kavya Maran Wedding: हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
Rishabh Pant and Kuldeep Yadav Trade IPL 2027: IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; कोट्यवधी रुपयांचा करार, पंतला 12 कोटींचे नुकसान
IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; पंतला 12 कोटींचे नुकसान
Rishabh Pant: रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? रिपोर्टमध्ये नवा दावा
रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? 

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Embed widget