Arjun Tendulkar Broke Father Sachin Tendulkar's Record : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) 14 धावांनी विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई संघाने हैदराबादवर (IPL 2023 MI vs SRH) सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत हॅटट्रिक पूर्ण केली आहे. अटीतटीच्या या सामन्यात मुंबईने शेवटच्या षटकात हैदराबादवर विजय मिळवला. या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकरने त्याच्या इंडियन प्रीमियर लीगच्या कारकिर्दीतील पहिला गडी बाद केला आहे. शेवटच्या षटकात गोलंदाजी करताना अर्जुनने आयपीएलमधील त्याची पहिली विकेट घेतली आहे. यासोबतच त्याने वडील सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला आहे. त्यामुळे हा सामना सचिन तेंडुलकर आणि त्याचा मुलगा अर्जुनसाठी अतिशय खास ठरला आहे.


अर्जुननं मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम


अर्जुन तेंडुलकरने इंडियन प्रीमियर लीगमधील त्याची पहिली विकेट घेत वडील सचिनचा विक्रम मोडला आहे. या सामन्यात अर्जुनने असं काही करुन दाखवलं जे त्याच्या वडीलांनाही जमलेलं नाही. आयपीएलमध्ये एक गडी बाद करत अर्जुन सचिन तेंडुलकरच्या एक पाऊल पुढे गेला आहे. सचिन तेंडुलकरचा एक विक्रम त्याने मोडीत काढला आहे. आयपीएलच्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकरला एकही विकेट घेता आलेली नाही, पण सचिनचा मुलगा अर्जुनने आयपीएलमधील पदार्पणानंतर दुसऱ्याचं सामन्यात आयपीएलमधील पहिली विकेट घेतली आहे. 


अर्जुन तेंडुलकरची आयपीलच्या कारकिर्दीतील पहिला विकेट


सनरायझर्स हैदराबाद संघाला शेवटच्या षटकात 20 धावांची गरज होती. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने युवा गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजीची संधी दिली. अर्जुनने कर्णधार रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवत शेवटच्या षटकात अवघ्या चार धावा दिल्या आणि एक बळी घेतला. अर्जुनच्या षटकात दोन विकेटही पडल्या. अब्दुल समद दुसऱ्या चेंडूवर धावबाद झाला. अर्जुन तेंडुलकरच्या पाचव्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारला रोहित शर्माने झेलबाद केलं आणि सनरायझर्स हैदराबादचा डाव आटोपला. अर्जुन तेंडुलकरने 2.5 षटकात 18 धावा दिल्या. अर्जुन तेंडुलकरने आयपीलएच्या दुसऱ्या सामन्यात त्याच्य आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली.


अर्जुननं वडील सचिन तेंडुलकरला टाकलं मागे 


मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना संपल्यानंतर समालोचक रवी शास्त्री यांनी सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनदरम्यान अर्जुन तेंडुलकरशी संवाद साधला. यावेळी शास्त्रींनी अर्जुनला सांगितलं की, त्याने आयपीएलमध्ये विकेट्स घेण्याच्या बाबतीत त्याचे वडिल सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे. सचिनने आयपीएलमध्ये गोलंदाजी करताना एकही विकेट घेतलेली नाही. दरम्यान, अर्जुनने हैदराबादविरुद्ध आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली.