PL 2023 Delhi Capitals Indigo Airlines : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दिल्ली संघाच्या अडचणी कमी व्हायच्या नाव घेत नाहीत. दिल्ली संघाला सलग पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातच आता दिल्लीच्या खेळाडूंचे क्रिकेटचे सामान चोरीला गेलेय. इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लइटमधून दिल्लीच्या खेळाडूंचे किट चोरीला गेलेय.. याबाबत एअरपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. किती किंमतीचे सामना चोरीला गेलेय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, 14 ते 16 लाख रुपयांचे सामान असल्याचे समजतेय.
एअरपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल -
इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाईटमधून दिल्लीच्या खेळाडूंचे क्रिकेट किट चोरी झालेय. याबाबत इंदिरा गांधी एअरपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. अनिल कुमार यादव नावाच्या व्यक्तीने याबाबतची तक्रार दिली आहे. अनिल कुमार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मी एक्प्रेस फ्राइट सिस्टम इंडिया प्रायव्हेटमध्ये कर्मचारी आहे. 15 एप्रिल रोजी बेंगलोर ते दिल्ली इंडिगो फ्लाईटमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचे क्रिकेट सामना बुकिंग झाले होते.
तक्रारदार अनिल कुमार यांच्या मते, 'इंडिगो एअरलाईन्स AWB No 312.55992414 एप्रिल 16 रोजी सकाळी 11.40 वाजता दिल्लीत दाखल झाले. आमचे कर्मचारी तेथे सामान नेहण्यासाठी पोहचले. त्यावेळी त्यांनी सर्व सामान गाडीमध्ये भरले. पण 17 एप्रिल रोजी खेळाडूंना सामान कमी मिळाले. खेळाडूंची क्रिकेट किट चोरीला गेल्या होत्या. यामध्ये डेविड वॉर्नरसह इतर खेळाडूंचे क्रिकेट सामना चोरीला गेले आहे.
कोणत्या खेळाडूंचे क्रिकेट सामान चोरीला गेलेय ?
यश धुल- 5 बॅट, थायपॅड, ग्लोव्हज
डेविड वॉर्नर- 1 बॅट, हेल्मेट आणि अन्य सामान
मिचेल मार्श- 2 बॅट आणि थायपॅड
रिपल पटेल- 1 बॅट
विकी- 1 बॅट, ग्लोव्हज, 2 सन ग्लासेज
अभिषेक पोरल- 3 बॅट थायपॅड, हेल्मेट आणि ग्लोव्हज 2 पीस
इंडिगोने आरोप फेटाळले -
तक्रारदार म्हणाला की, आम्ही पोलिसात रीतसर तक्रार दिली. त्यानंतर इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले. त्यांना वेअर हाऊस आणि सीसीटीव्ही तपासण्याची विनंती केली. पण इंडिगो कर्मचाऱ्यांनी असे करण्यास नकार दिला. पोलिसांनी आमचे सामान शोधून देण्यास मदत करावी.