Hardik Pandya and Jasmin Walia : खुल्लम खुल्ला प्यार करणाऱ्या हार्दिक पांड्याचं 'ब्रेकअप'? गर्लफ्रेंड जास्मिन वालियाला सोडलं, नेमकं काय घडलं?
Hardik Pandya and Jasmin Walia unfollowed : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Hardik Pandya and Jasmin Walia unfollowed Instagram
1/10
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
2/10
यावेळी कारण आहे, त्यांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.
3/10
यामुळे त्यांचं नातं संपल्याच्या चर्चांना जोर वाढला आहे.
4/10
हार्दिक आणि जास्मिनच्या रिलेशनशिपबाबत अफवा अनेक महिन्यांपासून सुरू होत्या.
5/10
सोशल मीडियावरील त्यांची अॅक्टिव्हिटी, एकत्र वेळ घालवलेले क्षण, आणि जास्मिनचा भारताच्या सामन्यांमध्ये दिसणं.
6/10
यामुळे चाहत्यांना वाटायचं की ते दोघं रिलेशनमध्ये आहेत. विशेषतः हार्दिक आणि नताशा स्टॅन्कोविचच्या घटस्फोटानंतर या चर्चांना हवा मिळाली होती.
7/10
जास्मिनला अनेकदा मुंबई इंडियन्सच्या बसजवळ पाहिलं गेलं होतं, तसेच ती आयपीएलमध्ये हार्दिकला चीअर करताना ही दिसली होती. ग्रीस ट्रिपमधल्या त्यांच्या फोटोमुळेही चाहत्यांच्या चर्चांना उधाण आलं होतं. तसंच, भारत-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सामन्यातही स्टेडियममध्ये दिसली होती.
8/10
मात्र आता दोघांनी एकमेकांना इंस्टाग्रामवरून अनफॉलो केल्यामुळे, सोशल मीडियावर पुन्हा नवीन चर्चा रंगली आहे.
9/10
एका युजरने लिहिलं की, “हार्दिक आणि जास्मिनने एकमेकांना अनफॉलो केलं आहे का? दोघं एकमेकांना फॉलो करत नाहीत.”
10/10
पण, दोघांनीही यावर अद्याप कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. ना त्यांनी कधी नात्याची कबुली दिली, ना ब्रेकअपबाबत काही बोलले.
Published at : 19 Jul 2025 04:16 PM (IST)