एक्स्प्लोर

Prithvi Shaw violates code of conduct: दिल्लीच्या पृथ्वी शॉ ला 25 टक्क्यांचा दंड, आचारसंहितेचा भंग केल्यामुळं कारवाई

दिल्लीचा फलंदाज पृथ्वी शॉ ला  25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पृथ्वीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

Prithvi Shaw violates code of conduct : आयपीएल 2022 या हंगामातील 45 वा सामना लखनौ सुपरजायंट्स (LSG) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात  वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सचा या मोसमातील हा 5 वा पराभव आहे. त्याचबरोबर हा सामना जिंकून लखनौ सुपरजाइंट्स 14 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दरम्यान, या सामन्यात दिल्लीचा फलंदाज पृथ्वी शॉ ला  25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

लखनौ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पृथ्वीवर ही कारवाई करण्यात आली आहे. शॉ ला मॅच फी च्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. पृथ्वी शॉ ला आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत लेव्हल-1 साठी दोषी ठरवण्यात आले आहे.  आचारसंहितेच्या स्तर-1 भंगासाठी, सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असतो. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज पृथ्वी शॉने आपली चूक मान्य केली आहे.

रोमहर्षक लढतीत लखनौची दिल्लीवर मात 

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर, लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार के एल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार के एल राहुलच्या 77 आणि दीपक हुडाच्या 52 धावांच्या जोरावर लखनौ सुपरजाइंट्सने 20 षटकांत 3 बाद 195 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून शार्दुल ठाकूरने 3 बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ निर्धारित 20 षटकांत 7 बाद 189 धावाच करु शकला. दिल्ली कॅपिटल्सकडून कर्णधार ऋषभ पंतने सर्वाधिक 44 धावा केल्या. तर अक्षर पटेलने 42 धावांचे योगदान दिले. लखनौ सुपरजायंट्सकडून मोहसीन खानने सर्वाधिक 4 बळी घेतले.

सध्या हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (GT) 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. गुजरात टायटन्सने आतापर्यंत 9 सामन्यातील 8 सामने जिंकले आहेत, तर एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. के एल राहुलचा संघ लखनऊ सुपरजाइंट्स आतापर्यंत 10 सामन्यांत 7 विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय राजस्थान रॉयल्स (RR) 12 गुणांसह तिसऱ्या तर सनरायझर्स हैदराबाद (SRH) 10 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) 10 गुणांसह 5 व्या तर दिल्ली कॅपिटल्स (DC) 8 गुणांसह 6 व्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget