Delhi Capitals Covid News : दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचा कोरोना अहवाल जाहीर; सामन्याबाबत मोठी अपडेट समोर
DC vs SRH : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज दिवसातील दुसरा सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC) या दोन्ही संघात पार पडणार असून त्यापूर्वी दिल्लीच्या एका नेट बोलरला कोरोना झाल्याची बातमी समोर आली होती.
![Delhi Capitals Covid News : दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचा कोरोना अहवाल जाहीर; सामन्याबाबत मोठी अपडेट समोर All the Delhi Capitals players have tested negative for COVID19 CSK vs DC match is going to play Delhi Capitals Covid News : दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचा कोरोना अहवाल जाहीर; सामन्याबाबत मोठी अपडेट समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/094497390d8b86d129e0f085077fb204_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Corona in IPL : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज दोन सामने पार पडणार असून पहिला सामना हैदराबाद आणि बंगळुरु यांच्यात सुरु आहे. पण दिवसातील दुसरा सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC) यांच्यात पार पडणार असून दिल्ली संघाती एका नेट बोलरला कोरोना झाल्यामुळे हा सामना होईल की नाही? अशी चर्चा होती. पण नुकताच सर्व दिल्लीच्या खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट समोर आला असून त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने सामना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्पोर्ट्स तक या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
दरम्यान याआधी देखील दिल्ली संघातच कोरोनाची बाधा झाली होती. पण संबधित खेळाडू कोरोनातून सावरले देखील. त्यामुळे संघाचे सर्व सामने वेळापत्रकाप्रमाणे खेळवले गेले होते. पण आज सामन्याला काही तास शिल्लक असताना ही माहिती समोर आल्याने आजच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह उभी राहत होती. यावेळी आयपीएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,''आज सकाळी दिल्ली संघाची कोरोना चाचणी करताना एका नेट बॉलरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खेळाडूंना आपआपल्या खोल्यांमध्ये राहण्यास सांगितले आहे.'' पण आता इतर खेळाडूंच्या कोरोना चाचणीचा अहवाल आल्याने सामना होणार असल्याचं समोर आलं आहे.
चेन्नई-दिल्ली आमने सामने
आजचा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात पार पडणार आहे. विशेष म्हणजे चेन्नईने याठिकाणी 3 पैकी 2 सामने जिंकले असून दिल्लीकरांसाठी त्याचं आव्हान अवघड असेल. त्यात आजचा सामना सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेण्याची शक्यता अधिक आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)