एक्स्प्लोर

CSK साठी दिलासा, IPL आधी रहाणे-शार्दूल फॉर्मात परतले, रणजी फायनलमध्ये केली कमाल

मुंबईनं विदर्भाविरुद्धच्या रणजी करंडक फायनलवर आज दुसऱ्या दिवशीच आपली पकड घट्ट केली. या सामन्यात मुंबईनं दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात दोन बाद 141 धावांची मजल मारली आहे.

Mumbai vs Vidarbha Final, Ranji Trophy Day 2 : मुंबईनं विदर्भाविरुद्धच्या रणजी करंडक फायनलवर आज दुसऱ्या दिवशीच आपली पकड घट्ट केली. या सामन्यात मुंबईनं दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात दोन बाद 141 धावांची मजल मारली आहे. त्यामुळं या सामन्यात मुंबईची एकूण आघाडी 260  धावांची झाली आहे. रणजी चषकाच्या फायनलमध्ये शार्दूल ठाकूर आणि अजिंक्य रहाणे यांनी चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात शार्दूल ठाकूरनं 75 धावांची खेळी केली होती. त्याशिवाय एक विकेटही घेतली होती. तर दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे यानं अर्धशतक ठोकलेय. अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर फॉर्मात परतल्यामुळे चेन्नईच्या ताफ्यात आनंदाचं वातावरण आहे. 

वानखेडे स्टेडियमवरच्या या सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणे 58 आणि अष्टपैलू मुशीर खान 51 धावांवर खेळत होता. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 107 धावांची अभेद्य भागीदारी रचली. अजिंक्यनं 109 चेंडूंमधली नाबाद 58 धावांची खेळी चार चौकार आणि एका षटकारानं सजवली. मुंबईच्या कर्णधाराचं यंदाच्या रणजी मोसमातलं हे केवळ दुसरं अर्धशतक ठरलं. मुशीर खानच्या 135 चेंडूंमधल्या नाबाद 51 धावांच्या खेळीला तीन चौकारांचा साज होता. त्याआधी, मुंबईनं विदर्भाला अवघ्या 105 धावांत गुंडाळून पहिल्या डावात 119 धावांची मोठी आघाडी घेतली. मुंबईकडून धवल कुलकर्णी, शम्स मुलानी आणि तनुष कोटियननं प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं.

अजिंक्यने डाव सावरला - 

विदर्भाला 105 धावांत गुंडाळल्यानंतर मुंबईल 119 धावांची आघाडी मिळाली. पण दुसऱ्या डावात मुंबईची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामी फलंदाज पृथ्वी शॉ आणि भुपेन ललवानी स्वस्तात माघारी परतले. विदर्भाचा संघ सामन्यात कमबॅक करेल असेच सर्वांना वाटत होते. पण कर्णधार अजिंक्य रहाणे यानं मुशीरला हाताशी धरत खडूस फलंदाजी केली. दोघांनी नाबाद 107 धावांची भागिदारी केली.  दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजिंक्य रहाणे 58 आणि मुशीर 51 धावांवर नाबाद होते. 

42 व्या जेतेपदाकडे मुंबईची वाटचाल - 

रणजी चषकाच्या फायनलवर मुंबईने वर्चस्व मिळावलं आहे. रणजी चषकाच्या इतिहासात मुंबई 48 वा फायनल सामना खेळत आहे. मुंबईने आतापर्यंत 41 वेळा रणजी चषकावर नाव कोरलं आहे. आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने  42 व्या जेतेपदाकडे वाटचाल केली आहे. दुसरीकडे विदर्भाला फक्त दोन वेळा रणजी चषकावर नाव कोरता आलेय. 

पहिल्या डावात शार्दूलची भन्नाट फटकेबाजी - 

जेतेपदच्या सामन्यात मुंबईला पहिल्या डवत फक्त 224 धावांवर समाधान मानावे लागले. विदर्भाच्या माऱ्यापुढे मुंबईची अवस्था अतिशय खराब झाली होती. मुंबईची अवस्था एकवेळ 6 बाद 111 अशी दैयनीय झाली होती. अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ हे दिग्गज स्वस्तात तंबूत परतले होते. पण त्याचवेळी शार्दूल ठाकूर संकटकाळात धावून आला. शार्दूल ठाकूर यानं झंझावती 75 धावांची खेळी केली. शार्दूलच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने सन्मानजनक धावसंख्या उभारली. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला.  विदर्भाचा डाव अवघ्या 105 धावांत संपुष्टात आला.  विदर्भाच्या एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. शम्स मुलानी, तनुश कोटियन आणि धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
Embed widget