एक्स्प्लोर

IPL 2024 Auction : 'या' 5 पाच देशी मोहऱ्यांवर आयपीएल संघमालक लाखात उधळायला एका पायावर तयार! कोण होणार सर्वाधिक 'मालामाल'?

IPL 2024 Auction : आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा भरपूर अनुभव असलेल्या अशा खेळाडूंवर लिलावात मोठी बोली लागणार हे नक्की आहे. देशातील 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर आयपीएल संघ मोठ्या प्रमाणात बोली लावू शकतात. 

IPL 2024 Auction Top 5 Uncapped Indian Players : भारताचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल 2024 चा बिगुल वाजू लागला आहे. यासाठी IPL 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा भरपूर अनुभव असलेल्या अशा खेळाडूंवर लिलावात मोठी बोली लागणार हे नक्की आहे. देशातील 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर आयपीएल संघ मोठ्या प्रमाणात बोली लावू शकतात. 

1- समीर रिझवी (Sameer Rizvi) 

देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या समीर रिझवीने काही दिवसांपूर्वी खेळल्या गेलेल्या UP T20 लीगमध्ये खळबळ उडवून दिली होती. लीगमध्ये कानपूर सुपर स्टार्सकडून खेळणाऱ्या समीर रिझवीने मेरठ मॅवेरिकविरुद्धच्या सामन्यात 59 चेंडूत 122 धावांची खेळी करून खूप चर्चेत आला होता. लिलावात ही खेळी उपयोगी पडू शकते.

2 - शाहरुख खान (Shah Rukh Khan) 

2023 च्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळणारा शाहरुख खान 2024 च्या हंगामापूर्वी रिलीज झाला आहे. शाहरुख अशा फलंदाजांपैकी एक आहे ज्यांच्याकडे वेगवान फलंदाजी करण्याची क्षमता आहे. शाहरुखने आतापर्यंत 83 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 133.52 च्या स्ट्राइक रेटने 928 धावा केल्या आहेत. शाहरुख देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून खेळतो.

3- स्वस्तिक चिकारा (Swastik Chikara) 

स्वस्तिकने UP T20 लीगच्या पहिल्या आवृत्तीत चमकदार कामगिरी केली होती. त्याने अवघ्या 7 सामन्यात 456 धावा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही कामिगरी लिलावात किती उपयोगी पडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

4- आशुतोष शर्मा (Ashutosh Sharma) 

मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या आशुतोष शर्माने रेल्वेकडून खेळताना 16 वर्षे जुना विक्रम मोडला होता. किंबहुना, त्याने T20 फर्स्ट क्लासमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला होता.

5- अर्पित शेठ (Arpit Sheth) 

अर्पित शेठने अलीकडेच खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 18 विकेट घेतल्या. बडोद्याकडून खेळणाऱ्या अर्पितने 32 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 101 बळी घेण्याचा शानदार विक्रम केला आहे.

या भारतीय खेळाडूंवर बोली लावली जाणार

दुसरीकडे, आयपीएलच्या पुढील हंगामासाठी या मिनी लिलावात एकूण 830 भारतीय खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. त्यात शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, उमेश यादव, मनीष पांडे, वरुण आरोन, केएस भरत, केदार जाधव, सिद्धार्थ कौल, धवल कुलकर्णी, शिवम मावी, शाहबाज नदीम, करुण नायर, चेतन साकारिया, मनदीप सिंग, बरिंदर सरन, जयदेव उन्नाद, जयदेव उनाड यांचा समावेश आहे. हनुमा विहारी आणि संदीप वॉरियर सारख्या कॅप्ड खेळाडूंसह अनेक तरुण प्रतिभावान खेळाडूंचा समावेश आहे.

या परदेशी खेळाडूंवर बोली लावली जाणार 

या मिनी लिलावात केवळ भारतीय खेळाडूच नाही तर परदेशी सुपरस्टार्सवरही करोडो रुपयांचा वर्षाव होणार आहे. या लिलावासाठी एकूण 336 परदेशी खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. यात ट्रॅव्हिस हेड, रचिन रवींद्र, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, डॅरिल मिशेल, हॅरी ब्रूक, आदिल रशीद, डेव्हिड मलान आणि टॉम कुरन, ख्रिस जॉर्डन, बेन डकेट, फिलिप सॉल्ट, टॉम बॅंटन आणि सॅम यांसारखे अनेक परदेशी सुपरस्टार्स आहेत.  

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget