एक्स्प्लोर
Advertisement
अखेरच्या चेंडूवर गुजरातचा दिल्लीवर रोमहर्षक विजय
नवी दिल्ली : गुजरात लायन्सनं दिल्ली डेअरडेव्हिल्सवर अवघ्या एका धावेनं विजय मिळवून आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. दिल्ली आणि गुजरात संघांमधला हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार झाला.
फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या या सामन्यात गुजरातनं दिल्लीला विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना दिल्लीची तीन बाद 16 अशी केविलवाणी अवस्था झाली होती.
दिल्लीच्या ख्रिस मॉरिसनं अवघ्या 17 चेंडूंत अर्धशतक झळकावला. यंदाच्या आयपीएल मोसमातलं हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं. ख्रिस मॉरिसनं 32 चेंडूंतली आपली 82 धावांची खेळी 4 चौकार आणि 8 षटकारांनी सजवली. पण त्याची ही खेळी दिल्लीला विजय मिळवून
देऊ शकली नाही.
या सामन्यात दिल्लीला विजयासाठी अखेरच्या षटकात 14 धावांची आवश्यकता होती. पण ड्वेन ब्राव्होनं अखेरच्या षटकांत केवळ 12 धावा देऊन गुजरातला विजय मिळवून दिला.
त्याआधी ड्वेन स्मिथ आणि ब्रेण्डन मॅक्युलमच्या अर्धशतकांच्या जोरावर गुजरातला 20 षटकांत सहा बाद 172 धावांची मजल मारता आली. ड्वेन स्मिथनं 30 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह 53 धावांची खेळी रचली.
ब्रेण्डन मॅक्युलमनं 36 चेंडूंतली आपली 60 धावांची खेळी सहा चौकार आणि तीन षटाकारांनी सजवली. दिल्लीकडून इमरान ताहिरनं चार षटकांत 24 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स काढल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement