एक्स्प्लोर

ज्यांनी आयपीएल गाजवलं, ते खेळाडू यावेळी कोणत्या संघात?

27 आणि 28 जानेवारी रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. ज्यात 360 भारतीयांसह 578 खेळाडूंवर बोली लावली जाईल.

मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमाची सुरुवात यावर्षी 7 एप्रिल रोजी मुंबईतून होईल, तर अंतिम सामना मुंबईतच 27 मे रोजी खेळवला जाईल. उद्घाटन सोहळा आणि अंतिम सामना मुंबईत होणार आहे. मात्र त्यापूर्वी 27 आणि 28 जानेवारी रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. ज्यात 360 भारतीयांसह 578 खेळाडूंवर बोली लावली जाईल. आयपीएल फ्रँचायझींनी महत्त्वाच्या खेळाडूंना रिटेन केलं आहे, मात्र सध्या करारबद्ध नसलेल्या खेळाडूंमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. त्यामुळे बोली लावताना चढाओढ पाहायला मिळणार आहे. अजिंक्य रहाणे : अजिंक्य रहाणेने आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंटचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र यावेळी दोन वर्षांनी पुनरागमन करत असलेल्या राजस्थान रॉयल्सने अजिंक्य रहाणेला रिटेन केलेलं नाही. त्यामुळे अजिंक्य रहाणेसाठी मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. शिखर धवन : शिखर धवनने 2008 साली दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. त्या आयपीएल मोसमात सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा खेळाडू ठरला होता. त्याने मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर (सनरायझर्स हैदराबाद) या संघांचंही प्रतिनिधित्व केलं आहे. मुरली विजय : आयपीएलमधील शतकवीर आणि टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयवरही मोठी बोली लागू शकते. आयपीएलमध्ये मुरली विजयच्या नावावर 100 सामन्यांमध्ये 2511 धावा आहेत. गौतम गंभीर : दोन वेळच्या चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरवरही यावेळी बोली लावली जाणार आहे. केकेआरने त्याला रिटेन केलेलं नाही. त्यामुळे फ्रँचायझींची त्याच्यावर नजर असेल. टीम इंडियातून तो बाहेर असला तरी त्याने रणजी आणि सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली आहे. युवराज सिंह : सिक्सर किंग म्हणून ओळख असलेल्या युवराज सिंहवर आयपीएल फ्रँचायझींची नजर असेल. युवराज सध्या टीम इंडियातून बाहेर आहे, मात्र सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. बेन स्टोक्स : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सवर मोठी बोली लावली जाऊ शकते. गेल्या आयपीएल मोसमात तो सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता. शिवाय त्याने संपूर्ण मालिकेत दमदार कामगिरी केली होती. ख्रिस गेल : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना ख्रिस गेलने अनेक विक्रम नावावर केले होते. षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडणाऱ्या गेलवर यावेळी फ्रँचायझींची नजर असेल. कुलदीप यादव : टीम इंडियाचा युवा खेळाडू कुलदीप यादवने त्याच्या गोलंदाजीकडे सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या कुलदीपने गेल्या एक वर्षात टीम इंडियात फिरकीपटू गोलंदाज म्हणून स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. त्याच्यावरही आयपीएल फ्रँचायझींची नजर असेल. यजुवेंद्र चहल : टीम इंडियाचा विश्वसनीय युवा गोलंदाज यजुवेंद्र चहलला आपल्या संघात घेण्यासाठी आयपीएल फ्रँचायझींची चढाओढ दिसून येणार आहे. रविचंद्रन अश्विन : अश्विनने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून आतापर्यंत मॅच विनर खेळाडू म्हणून कामगिरी केली आहे. सीएसकेच्या निलंबनानंतर त्याने रायझिंग पुणे सुपरजायंटचं प्रतिनिधित्व केलं होतं. लिलावात अश्विनवर आमची नजर असेल, असं सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अगोदरच स्पष्ट केलं आहे. कोणत्या संघात कोणते खेळाडू रिटेन? मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमरा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – आतापर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकता न आलेल्या आरसीबीने कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि सरफराज अहमदला रिटेन केलं. ख्रिस गेलसारखा स्फोटक फलंदाज आरसीबीने सोडला आहे. चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्र सिंह धोनी, रवींद्र जाडेजा आणि सुरेश रैना दिल्ली डेअरडेव्हिल्स – ऑलराऊंडर ख्रिस मॉरिस, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्स – कोलकात्याने कर्णधार गौतम गंभीरला सोडलं आहे. सुनील नारायण आणि आंद्रे रसलला कायम केलं आहे. राजस्थान रॉयल्स – स्टीव्ह स्मिथ सनरायझर्स हैदराबाद – डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार किंग्ज इलेव्हन पंजाब – अक्षर पटेल
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget