एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आयपीएल लिलाव : पहिला दिवस स्टोक्सचा, गेल, मलिंगावर बोली नाही
यंदाच्या आयपीएल मोसमासाठी सुरु असलेल्या लिलावाचा पहिला दिवस इंग्लंडचा ऑलराऊंडर खेळाडू बेन स्टोक्सच्या नावावर राहिला.
बंगळुरु : यंदाच्या आयपीएल मोसमासाठी सुरु असलेल्या लिलावाचा पहिला दिवस इंग्लंडचा ऑलराऊंडर खेळाडू बेन स्टोक्सच्या नावावर राहिला. त्याच्यावर राजस्थान रॉयल्सने सर्वाधिक साडे बारा कोटींची बोली लावली. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही तो सर्वात महागडा खेळाडू ठरला.
याशिवाय सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल आणि मनीष पांडे सर्वाधिक महागडे भारतीय खेळाडू ठरले. दोघांवरही प्रत्येकी 11 कोटींची बोली लावण्यात आली. मनीष पांडेला सनरायझर्स हैदराबादने, तर राहुलला किंग्ज इलेव्हन पंजाबने खरेदी केलं आहे.
पहिल्या दिवशीच्या लिलावात ख्रिस गेल, लसिथ मलिंगा, ईशांत शर्मा, मिशेल मॅक्लंघन, मुरली विजय, जेम्स फॉल्कनर, जोश हेझलवूड, हाशिम आमला, जॉन बेअरस्टो, सॅम बिलिंग्स, पार्थिव पटेल आणि ज्यो रुट यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही.
गौतम गंभीरचं दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये पुनरागमन
कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या गौतम गंभीरचं दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये पुनरागमन झालं आहे. दिल्लीने त्याला 2.8 कोटींमध्ये खरेदी केलं. अंडर-19 संघाचा कर्णधार पृथ्वी शॉसाठी दिल्लीने 1 कोटी 20 लाख रुपये खर्च केले.
गेल्या आयपीएल मोसमात दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी खेळलेल्या कागिसो रबाडासाठी चेन्नई सुपर किंग्जने 4.2 कोटींची बोली लावली, मात्र दिल्लीने राईट टू मॅचचा वापर करत रबाडाला खरेदी केलं. दिल्लीचा गेल्या वेळचा खेळाडू यावेळी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसेल. राजस्थानने त्याच्यासाठी 8 कोटी रुपये खर्च केले. तर दिल्लीने मोहम्मद शमीसाठीही राईट टू मॅचचा वापर केला. शमीला हैदराबादने 3 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं.
अश्विन पंजाबच्या ताफ्यात
दोन कोटींची बेस प्राईस असलेल्या ग्लेन मॅक्सवेलला दिल्लीने 9 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं. तर कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला 9.4 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात सहभागी केलं. दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबने रविचंद्रन अश्विनवर 7.6 कोटींची बोली लावत त्याला खरेदी केली. अश्विनसाठी राजस्थान रॉयल्स आणि पंजाबमध्ये चढाओढ पाहायला मिळाली.
पंजाबने ड्वेन ब्रॅव्होला खरेदी केलं होतं, मात्र चेन्नई सुपर किंग्जने राईट टू मॅचचा वापर करत पुन्हा ब्रॅव्होला खरेदी केलं. तर शिखर धवन (हैदराबाद), किरॉन पोलार्ड (मुंबई), अंजिक्य रहाणे (राजस्थान रॉयल्स) आणि फाफ डु प्लेसिस (चेन्नई) यांचा त्यांच्या जुन्याच संघांमध्ये समावेश करण्यात आला आहे. चेन्नईने हरभजन सिंहला 2 कोटींमध्ये खरेदी केलं. बांगलादेशचा ऑलराऊडंर खेळाडू शकीब अल हसनसाठी हैदराबादने 2 कोटींची बोली लावली.
युवराजचं पंजाबमध्ये पुनरागमन
आयपीएलची सुरुवात पंजाबमधून करणाऱ्या युवराज सिंहचं होम टीममध्ये पुनरागमन झालं आहे. त्याच्यासाठी पंजाबने 2 कोटींची बोली लावली. केदार जाधवसाठी चेन्नईने 7.8 कोटी रुपये खर्च केले.
टी-20 स्पेशालिस्ट खेळाडू म्हणून ओळख असलेला कॉलिन मुन्रो आणि सलामीवीर फलंदाज जेसन रॉय यांना दिल्लीने खरेदी केलं आहे. दिल्लीने या खेळाडूंसाठी अनुक्रमे 1.9 कोटी आणि 1.5 कोटींची बोली लावली.
चेन्नई सुपर किंग्ज :
- केदार जाधव – 7.8 कोटी रुपये
- ड्वेन ब्रॅव्हो – 6.40 कोटी रुपये
- कर्ण शर्मा – 5 कोटी रुपये
- शेन वॉट्सन – 4 कोटी रुपये
- अंबाती रायडू – 2.2 कोटी रुपये
- फफ डू प्लेसिस – 1.6 कोटी रुपये
- इम्रान ताहिर – 1 कोटी रुपये
- ग्लेन मॅक्सवेल – 9 कोटी रुपये
- कागिसो रबाडा – 4.2 कोटी रुपये
- अमित मिश्रा – 4 कोटी रुपये
- विजय शंकर – 3.2 कोटी रुपये
- राहुल तेवाटिया – 3 कोटी रुपये
- मोहम्मद शमी – 3 कोटी रुपये
- गौतम गंभीर – 2.8 कोटी रुपये
- कॉलिम मुन्रो – 1.9 कोटी रुपये
- जेसन रॉय – 1.5 कोटी रुपये
- पृथ्वी शॉ – 1.2 कोटी रुपये
- आवेश खान – 70 लाख रुपये
- हर्षल पटेल – 20 लाख रुपये
- लोकेश राहुल – 11 कोटी रुपये
- रविचंद्रन अश्विन – 7.6 कोटी रुपये
- अरॉन फिंच – 6.2 कोटी रुपये
- मार्कस स्टॉईनिस – 6.2 कोटी रुपये
- करुण नायर – 5.6 कोटी रुपये
- अंकित सिंह राजपूत – 3 कोटी रुपये डेव्हिड मिलर - 3 कोटी रुपये
- युवराज सिंह – 2 कोटी रुपये
- मयंक अग्रावल – कोटी रुपये
- ख्रिस लीन – 9.6 कोटी रुपये
- मिचेल स्टार्क - 9.4 कोटी रुपये
- दिनेश कार्तिक – 7.4 कोटी रुपये
- रॉबिन उथप्पा – 6.4 कोटी रुपये
- कुलदीप यादव – 5.8 कोटी रुपये
- पियुष चावला – 4.2 कोटी रुपये
- नितीश राणा – 3.4 कोटी रुपये
- कमलेश नागरकोटी – 3.2 कोटी रुपये
- शुबमान गिल – 1.8 कोटी रुपये
- इशांक जग्गी – 20 लाख रुपये
- कृणल पंड्या – 8.8 कोटी रुपये
- इशान किशन – 6.2 कोटी रुपये
- किरॉन पोलार्ड – 5.4 कोटी रुपये
- पॅट कमिन्स – 5.4 कोटी रुपये
- सूर्यकुमार यादव – 3.2 कोटी रुपये
- मुस्ताफिजुर रहमान – 2.2 कोटी रुपये
- बेन स्टोक्स – 12.5 कोटी रुपये
- संजू सॅमसन – 8 कोटी रुपये
- जोफ्रा आर्चर – 7.2 कोटी रुपये
- जॉस बटलर – 4.4 कोटी रुपये
- अजिंक्य रहाणे – 4 कोटी रुपये
- डार्सी शॉर्ट – 4 कोटी रुपये
- राहुल त्रिपाठी – 3.4 कोटी रुपये
- स्टुअर्ट बिन्नी – 50 लाख रुपये
- यजुवेंद्र चहल – 6 कोटी रुपये
- उमेश यादव – 4.2 कोटी रुपये
- ब्रँडन मॅक्क्युलम – 3.6 कोटी रुपये
- नवदीप सैनी – 3 कोटी रुपये
- क्विंटन डी कॉक – 2.8 कोटी रुपये
- कॉलिन डी ग्रँडहोम – 2.2 कोटी रुपये
- मोईन अली – 1.7 कोटी रुपये
- मनन वोहरा – 1.1 कोटी रुपये
- कुलवंत खेजरोलिया – 85 लाख रुपये
- अनिकेत चौधरी – 30 लाख रुपये
- मनीष पांडे – 11 कोटी रुपये
- रशीद खान – 9 कोटी रुपये
- शिखर धवन – 5.2 कोटी रुपये
- रिद्धीमान साहा – 5 कोटी रुपये
- सिद्धार्थ कौल – 3.8 कोटी रुपये
- दीपक हुडा – 3.6 कोटी रुपये
- सईद खलीला अहमद – 3 कोटी रुपये
- केन विल्यम्सन – 3 कोटी रुपये
- कार्लोस ब्रेथवेट – 2 कोटी रुपये
- शकीब अल हसन – 2 कोटी रुपये
- युसूफ पठाण – 1.9 कोटी रुपये
- बासिल थम्पी – 95 लाख रुपये
- टी. नटराजन – 40 लाख रुपये
- रिकी भुई – 20 लाख रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement