एक्स्प्लोर

IPL Auction 2020: आयपीएलच्या 13व्या मोसमासाठी लिलाव, 'या' खेळाडूंवर लावली जाऊ शकते सर्वाधिक बोली

आयपीएलच्या आगामी मोसमासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया आज (गुरुवारी) कोलकात्यात होणार आहे. दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात होईल. या प्रक्रियेत 332 खेळाडूंचा लिलाव होणार असून त्यातून 73 खेळाडूंवर फ्रॅन्चायझींकडून बोली लावण्यात येईल.

कोलकाता : आयपीएलच्या आगामी मोसमासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया आज (गुरुवारी) कोलकात्यात होणार आहे. दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात होईल. या प्रक्रियेत 332 खेळाडूंचा लिलाव होणार असून त्यातून 73 खेळाडूंवर फ्रॅन्चायझींकडून बोली लावण्यात येईल. या 332 खेळाडूंमध्ये 186 भारतीय तर 146 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि ख्रिस लीन या दोन कोटी मूळ किंमत असलेल्या खेळाडूंवर चाहत्यांची नजर राहिल. आयपीएलच्या 13व्या मोसमाची सुरुवात पुढच्या वर्षी म्हणजेच, मार्च 2020 मध्ये होणार आहे. आज होणाऱ्या लिलावात खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. या लिलावात युवा खेळाडूंसह वरीष्ठ खेळाडूंचाही समावेश असणार आहे. 18 वर्ष ते 48 वर्षांच्या खेळाडूंसाठी वेगवेगळ्या फ्रेंचायजींमध्ये चढाओढ रंगणार आहे. वरिष्ठ आणि युवा खेळाडूंमध्ये चुरस यंदाच्या लिलावात सर्वात वरिष्ठ खेळाडू भारताचा 48 वर्षीय प्रवीण तांबे असणार आहे. तसेच सर्वात युवा खेळाडू अफगाणिस्तानचा नूर अहमद आहे. नूर अहमद 14 वर्षांचा आहे. प्रवीण तांबे आतापर्यंत आयपीएलमध्ये तीन संघामधून खेळला आहे. त्याने 33 सामने खेळला असून 28 विकेट्सही घेतले आहेत. एका हॅट्रिकचाही समावेश आहे. तसेच नूर एक चायनामॅन बॉलर आहे आणि त्याची बेस प्राइज 30 लाख रूपये आहे. या खेळाडूंवर असेल सर्वांची नजर : 1. ग्लॅन मॅक्सवेल : 2 कोटी 2. शिमरॉन हेटमायर : 50 लाख 3. जेसन रॉय : 1.5 कोटी या युवा खेळाडूंवर असेल लक्ष : 1. यशस्वी जायस्वाल : अवघ्या 18 वर्षांचा यशस्वीने लिस्ट ए सामन्यांमध्ये डबल सेन्चुरी केली होती. 2. प्रियम गर्ग : 19 वर्षांचा प्रियम भारतीय अंडर 19 संघाचा कर्णधार आहे. टी20 सामन्यांमध्ये त्याचा 133 स्ट्राइक रेट आहे. 3. ईशान पारेल : ताशी 140 किलोमीटर वेगाने चेंडू टाकणारा ईशान 21 वर्षांचा आहे. कोणत्या फ्रेंचायझी लावणार बोली? इंडियन प्रीमियर लीग 2020च्या मोसमासाठी होणाऱ्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू, मुंबई इन्डियन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब, दिल्ली कॅपिटल्स, सनराइजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या फ्रेंचायजी बोली लावणार आहेत. कोणत्या खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली? आतापर्यंतच्या मोसमांमध्ये अनेक खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागली आहे. त्यामुळे यंदाच्या लिलावासाठी सर्वाधिक बोली लागणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अनेकांचा समावेश आहे.
  • 2008 : महेंद्र सिंह धोनी (चेन्नई सुपर किंग्स), 9.5 कोटी
  • 2009 : केविन पीटरसन, एड्र्यू फिल्टॉफ, 9.8 कोटी
  • 2010 : कीरोन पोलार्ड (मुंबई इन्डियन्स), 3.5 कोटी
  • 2011 : गौतम गंभीर (कोलकाता नाइट राइडर्स), 11.04 कोटी
  • 2012 : रवींद्र जाडेजा (चेन्नई सुपर किंग्स), 12 कोटी
  • 2013 : ग्लेन मॅक्सवेल(मुंबई इन्डियन्स), 5.3 कोटी
  • 2014 : युवराज सिंह (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू), 14 कोटी
  • 2015 : युवराज सिंह (दिल्ली डेअरडेविल्स), 16 कोटी
  • 2016 : शेन वॉटसन ( रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू), 9.5 कोटी
  • 2017 : बेन स्टोक्स (रायझिंग पुणे सुपरजाएंट्स), 14.5 कोटी
  • 2018 : बेन स्टोक्स (राजस्थान रॉयल्स), 12.5 कोटी
  • 2019 : जयदेव उनादकट, वरुण चक्रवर्ती, 8.4 कोटी

महत्त्वाच्या बातम्या

India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
FIFA World Cup : भारत-पाक क्रिकेटपेक्षाही खतरनाक! जेव्हा दोन देशांचे खेळाडूं फुटबॉल मैदानावर एकमेकांचा जीव घ्यायला निघाले...
भारत-पाक क्रिकेटपेक्षाही खतरनाक! जेव्हा दोन देशांचे खेळाडूं फुटबॉल मैदानावर एकमेकांचा जीव घ्यायला निघाले...
India vs Afghanistan: टीम इंडियाकडून अफगाणिस्तानची तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच शिकार; कसोटी क्रिकेटमधील भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय
टीम इंडियाकडून अफगाणिस्तानची तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच शिकार; कसोटी क्रिकेटमधील भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय
Ind vs Afg Test Day-3 : भारताचा अफगाणिस्तानवर मोठा विजय; डेब्यू टेस्टमध्ये मानव सुथारची फिरकीची जादू, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
भारताचा अफगाणिस्तानवर मोठा विजय; डेब्यू टेस्टमध्ये मानव सुथारची फिरकीची जादू, तिसऱ्या दिवशी काय घडलं?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
Iran War Live Update: इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं

Embed widget