एक्स्प्लोर
IPLAuction2019: 16 कोटींची बोली लागलेल्या युवराजसिंगचा भाव गडगडला
यंदाच्या लिलावाच्या पहिल्या फेरीमध्ये युवराजला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा त्याचा लिलाव करण्यात आला. मुख्य म्हणजे ‘सिक्सर किंग’ युवराजसारख्या फलंदाजावर दुसऱ्या फेरीतसुद्धा केवळ मुंबईनेच बोली लावली.

जयपूर : इंडियन प्रीमियर लीग 2019 साठी जयपूर येथे खेळाडूंचा 18 डिसेंबरला लिलाव पार पडला. आयपीएलचे यंदाचे हे बारावे वर्ष आहे. एकेकाळचा आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू असलेला युवराजसिंग पहिल्या फेरीत अनसोल्ड ठरला होता. पण अखेरीस मुंबई इंडियन्सने त्याला एक कोटीच्या मूळ किंमतीत खरेदी करतं संघात घेतले. यंदाच्या लिलावाच्या पहिल्या फेरीमध्ये युवराजला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा त्याचा लिलाव करण्यात आला. मुख्य म्हणजे ‘सिक्सर किंग’ युवराजसारख्या फलंदाजावर दुसऱ्या फेरीतसुद्धा केवळ मुंबईनेच बोली लावली. कारकीर्दीतील ऐन बहरात असताना युवराजवर 16 कोटी रुपयांची बोली लागली होती. युवराज काही वर्षे किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली डेअरडेविल्स या संघांमधून खेळला होता. गेल्या वर्षी किंग्ज इलेव्हन पंजाबने युवराजला दोन कोटी रुपये या मूळ किमतीलाच घेतले होते. परंतु युवराजला गेल्या मोसमात आठ डावांमध्ये एकूण 65 धावाच करता आल्याने पंजाब संघाने त्याला संघात स्थान न देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आगामी विश्वचषकात युवराजला संधी मिळणार नसल्याचेही जवळपास स्पष्ट झाले आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून युवराज एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पहिल्या फेरीत कोणीही विकत न घेतलेल्या युवराजला दुसऱ्या फेरीत मुंबईने विश्वास दाखवत संघात स्थान दिले आहे. त्यामुळे आता युवराजसमोर चांगली कामगिरी करुन दाखवण्याचे आव्हान असणार आहे. आयपीएलमधील युवराजची कामगिरी
- सामने : 128
- धावा : 2652
- अर्धशतकं : 12
- सर्वाधिक धावा : 83
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















