RR vs DC, Innings Highlights : राजस्थानची दिल्लीवर तीन विकेट्सने मात
फलंदाजीसाठी प्रथम मैदानात उतरलेल्या दिल्लीला 20 षटकात 8 बाद 147 धावा करता आल्या. त्यानंतर राजस्थानच्या फलंदाजांनी दिल्लीने दिलेलं आव्हान अखेरच्या षटकात पूर्ण केलं.

RR vs DC : आयपीएल 2021 च्या आजच्या सातव्या सामन्यामध्ये राजस्थानने दिल्लीवर तीन विकेटने विजय मिळवला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्लीनं राजस्थानसमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं आहे. फलंदाजीसाठी प्रथम मैदानात उतरलेल्या दिल्लीला 20 षटकात 8 बाद 147 धावा करता आल्या. त्यानंतर राजस्थानच्या फलंदाजांनी दिल्लीने दिलेलं आव्हान अखेरच्या षटकात पूर्ण केलं. ख्रिस मॉरीसने अखेरच्या दोन षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने या हंगामातील पहिला सामना जिंकला आहे.
फलंदाजीसाठी प्रथम मैदानात उतरलेल्या दिल्लीला 20 षटकात 8 बाद 147 धावा करता आल्या. दुसऱ्याच ओव्हरमध्ये जयदेव उनाडकटनं पृथ्वी शॉला 2 धावांवर पृथ्वी शॉला बाद केलं. त्यानंतर पुढच्या चौथ्या षटकात जयदेव उनाडकटनं शिखर धवनला 9 धावांवर बाद करत दिल्लीची सलामीची जोडी तंबूत पाठवली. यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेलाही मोठी खेळी करता आली नाही. त्यालाही जयदेवनं 8 धावांवर बाद केलं. त्यानंतर आलेल्या मार्कस स्टॉयनिसला मुस्तफिजुरनं शून्यावर तंबूत पाठवलं.
यानंतर आलेल्या ललित यादवला सोबत घेऊन दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनं डावाला आकार दिला. ऋषभनं 31 चेंडूंमध्ये 9 चौकारांसह 51 धावा केल्या. त्यानंतर तो धावबाद झाला. ललित यादवनं 20 धावांची खेळी केली तर टॉम करननं 21 धावा केल्या. तर ख्रिस वोक्सनं 15 धावा करत संघाला 147 धावसंध्येवर नेऊन ठेवले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
