IPL 2021, PBKS vs MI : चेन्नईत रंगणार मुंबई-पंजाबची लढत, विजयासाठी दोन्ही संघ उत्सुक
IPL 2021, PBKS vs MI : रोहित शर्माची मुंबई आणि राहुलची पंजाब टीम विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबईला पराभव स्वीकारावा लागला होता. तर पंजाबनं मागील सलग तीन सामने गमावले आहेत.
IPL 2021, PBKS vs MI : आयपीएलमध्ये आज चेन्नईच्या मैदानावर मुंबई विरुद्ध पंजाबमध्ये लढत रंगणार आहे. रोहित शर्माची मुंबई आणि राहुलची पंजाब टीम विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबईला पराभव स्वीकारावा लागला होता. तर पंजाबनं मागील सलग तीन सामने गमावले आहेत. चेन्नई, दिल्ली आणि हैदराबादविरोधात पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स हा सामना जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या नंबरवर येण्यासाठी उत्सुक आहे. मुंबईकडून रोहित शर्मानं चांगली फलंदाजी केली असली तरी मध्यक्रमाच्या फलंदाजांनी चांगलीच निराशा केली. आहे. आतापर्यंत गोलंदाजांनीच मुंबईला तारले आहे. मात्र दिल्लीविरुद्ध मुंबईला पराभव स्विकारावा लागला. सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक आणि कृणाल पंड्या यांच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा मुंबईला आहे. सध्या मुंबई दोन विजय आणि दोन पराभवासह चौथ्या नंबरवर आहे.
दुसरीकडे पंजाबकडे मातब्बर फलंदाज असले तरी कर्णधार केएल राहुल आणि मयांक अगरवाल वगळता अन्य खेळाडू चमकू शकलेले नाहीत. ख्रिस गेल, निकोलस पूरनसारखे खेळाडू अपयशी ठरत असल्याने संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. आज या दोघांसह दीपक हुडाकडून देखील अपेक्षा आहेत. सध्या पंजाबचा संघ एक विजय आणि तीन पराभवासह सातव्या नंबरवर आहे.