IPL 2020, SRHvsDC | पॉईंट टेबलमध्ये टॉपवर असलेल्या दिल्लीचा विजयाच्या शोधात असलेल्या हैदराबादशी सामना
दिल्लीची फलंदाजी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. युवा पृथ्वी शॉची बॅट चेन्नईविरुद्ध तळपली. शिखर धवन, ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनीही चांगली खेळी केली.
IPL 2020, SRHvsDC : सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये आजचा सामना रंगणार आहे. आजचा सामना अशा दोन संघांमध्ये होणार आहे, त्यातील एक पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे, तर दुसरा संघ शेवटच्या स्थानावर आहे. दिल्लीने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर, हैदराबाद हा या स्पर्धेत एकमेव संघ आहे ज्याने विजयाचं खातं अद्याप उघडलेलं नाही.
दिल्ली संघ जबरदस्त फॉर्ममध्ये
दिल्लीची फलंदाजी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. युवा पृथ्वी शॉची बॅट चेन्नईविरुद्ध तळपली. शिखर धवन, ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनीही चांगली खेळी केली. दिल्लीचा फलंदाजीचा क्रम ज्याप्रकारे आहे, त्यामुळे मोठी धावसंख्या सहज उभारली जाते. आणि हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा संघ मोठी धावसंख्या उभारु शकते.
गेल्या सामन्यात पृथ्वी शॉने 43 चेंडूत 64 धावा केल्या. शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनीही चांगल्या धावा केल्या पण ते ज्या शैलीसाठी ओळखले जातात त्या शैलीत नव्हते. या सामन्यात ऋषभ पंत आपल्या जुन्या फॉर्ममध्ये यावा असं दिल्ली संघाला वाटतंय.
दिल्ली गोलंदाजीतही मजबूत दिसत आहे. शेवटच्या सामन्यात कगिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे यांनी मागील सामन्यात चांगली कामगिरी केली. अक्षर पटेल आणि अमित मिश्रा यांनी देखील प्रभावी गोलंदाजी केली. आर अश्विन फिट आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र अश्विनचं संघात पुनरागमन झालं तर अमित मिश्राला बाहेर बसावं लागू शकतं.
हैदराबादची विजयासाठी धडपड
हैदराबादला विजय मिळवायचा असेल तर त्यांना फलंदाजीच्या क्रमवारीतील समस्या सोडवावी लागेल. जॉनी बेअरस्टो, डेव्हिड वॉर्नर आणि काही प्रमाणात मनीष पांडे यांच्यानंतर टी -20 फॉर्मेटची गरज भागवून वेगवान गोलंदाजी करणारा फलंदाज संघात नाही. दोन्ही सामन्यात हैदराबादला हीच कमतरता भासली आहे. जर वॉर्नर, बेअरस्टो मैदानात टिकले तर संघाची धावसंख्या चांगली असते. मात्र दोघे लवकर बाद झाले तर संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारणेही अवघड होतंय.
मोहम्मद नबी काही प्रमाणात वेगवान फलंदाजी करु शकतो. मात्र हैदराबादला आंद्रे रसेल, कायरन पोलार्ड सारख्या खेळाडूची आवश्यकता आहे. प्रियांम गर्ग, रिद्धिमान साहा, अभिषेक शर्मा यासाठी सक्षम सध्यातरी दिसत नाहीत. मधल्या फळीत अनुभवी खेळाडूंची कमतरता आहे. हैदराबादला येथे काम करण्याची आवश्यक आहे.
गोलंदाजीबाबत म्हणायचं तर हैदराबाद येथे काहीही करू शकतो. त्याच्याकडे कमी धावसंख्या असतानाही सामना जिंकण्याची क्षमता आहे. भुवनेश्वर कुमारवर वेगवान गोलंदाजीची धुरा आहे. संदीप शर्मा त्यांला चांगली साथ देतो. फिरकीमध्ये संघाकडे राशिद खानसारखा दमदार गोलंदाज असून संघात बदल न झाल्यास मोहम्मद नबीही बॉलसह महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.