मुंबई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या 13 व्या सीजनचे वेळापत्रक जारी झालं आहे. या वेळापत्रकानुसार आयपीएलच्या 13 व्या सीजनचा पहिला सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत.


इंडियन प्रीमियर लीगचा पहिला मानकरी संघ राजस्थान रॉयल्स यंदा पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहे. मागील सिझनमध्ये सुरुवात खराब होऊन देखील प्ले ऑफमध्ये जागा मिळवली होती. यंदा दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याच्या उद्देशाने संघ मैदानात उतरणार आहे.


राजस्थानच्या संघात यावेळी मोठे बदल झाले आहेत. टीमचा नियमित सदस्य अजिंक्य रहाणे यावेळी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. तर बेन स्टोक्सदेखील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. संघाची मदार आता कॅप्टन स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसनसारख्या अनुभवी खेळाडूंवर आहे.


यंदा राजस्थान रॉयल्सचा सामना कुणाशी कधी होईल, जाणून घ्या


22 सप्टेंबर- मंगळवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स


27 सप्टेंबर- तंबर - रविवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब


30 सप्टेंबर- - बुधवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स


3 ऑक्टोबर- शनिवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बैंगलोर


6 ऑक्टोबर- मंगळवार - मुंबई इंडियंस विरुद्ध राजस्थान रॉयल्स


9 ऑक्टोबर- शुक्रवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

11 ऑक्टोबर- रविवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद


14 ऑक्टोबर- बुधवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स


17 ऑक्टोबर- शनिवार - 33वां मैच - रॉयल चैलेंजर्स बैंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स


19 ऑक्टोबर- सोमवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स


22 ऑक्टोबर- गुरुवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद

25 ऑक्टोबर - रविवार - मुंबई इंडियंस विरुद्ध राजस्थान रॉयल्स


30 ऑक्टोबर- शुक्रवार - किंग्स इलेवन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स


1 नोव्हेंबर- रविवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स


महत्त्वाच्या बातम्या :