दुबई : चेन्नई सुपर किंग्जनंतर आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघातही कोरोनाव्हायरसने शिरकाव केला आहे. दिल्ली संघाचे असिस्टंट फिजिओथेरेपिस्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघासोबतत असलेले असिस्टंट फिजिओथेरेपिस्ट दुबईत पोहोचल्यानंतर क्वॉरन्टाईन होते. तिथे त्यांची कोरोना चाचणी दोन वेळा निगेटिव्ह आली. परंतु तिसरी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.


सुदैवाची गोष्ट म्हणजे ते किंवा संघातील खेळाडू एकमेकांच्या संपर्कात नव्हते. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. 14 दिवसांच्या क्वॉरन्टाईननंतर आता दोन वेळा त्यांची चाचणी निगेटिव्ह आली तर त्यांना पुन्हा एकदा संघासोबत राहण्याची परवानगी दिली जाईल. दिल्ली कॅपिटल्सचं वैद्यकीय पथक त्यांच्या संपर्कात आहे.


चेन्नईच्या खेळाडूंसह सपोर्ट स्टाफला कोरोना
याआधी चेन्नई सुपरकिंग्जच्या दोन खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील 12 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर चेन्नईच्या संघाने क्वारंटाइन कालावधी आठवडाभरासाठी वाढवला होता. परिणामी चेन्नईचा संघ सुरुवातीच्या सरावाला मुकला होता.


आयपीएलचं वेळापत्रक जारी
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या तेराव्या मोसमाचे वेळापत्रक जारी झालं आहे. या वेळापत्रकानुसार आयपीएलच्या तेराव्या सीजनचा पहिला सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत.


संबंधित बातम्या