IPL 2020, RCB vs RR: बंगलोरचा सीजमधील तिसरा विजय, राजस्थानचा आठ विकेटने पराभव
राजस्थानने 20 षटकांत सहा गडी गमावून 154 धावा बनवल्या होत्या. या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आरसीबीने 19.1 षटकात दोन विकेट गमावत सहज विजय मिळवला.
IPL 2020, RCB vs RR: आयपीएल 2020 च्या 15 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सचा आठ गडी राखून पराभव केला. या मोसमातील बंगलोरचा हा तिसरा विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत सहा गडी गमावून 154 धावा बनवल्या होत्या. या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आरसीबीने 19.1 षटकात दोन विकेट गमावत सहज विजय मिळवला.
युवा फलंदाज देवदत्त पड्डिकल आणि कर्णधार विराट कोहली यांनी निर्णायक खेळी केली. पड्डिकलने 45 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकारासह 63 धावा केल्या. तर कोहली 53 चेंडूत 72 धावा करून नाबाद राहिला. या दरम्यान कोहलीच्या आपल्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार लगावले.
त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणार्या स्टीव्ह स्मिथच्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. डावाच्या तिसर्या षटकात इसुरु उडानाच्या चेंडूवर पाच धावा काढून स्टीव्ह स्मिथ पॅव्हेलियनमध्ये परतला. स्मिथनंतर आक्रमक फलंदाजी करणारा जोस बटलर 22 धावा करुन बाद झाला. फॉर्मात असलेला संजू सॅमसनही स्वस्तात माघारी परतला. बंगलोरकडून युझवेंद्र चहलने चार धावांवर सॅमसनला झेलबाद केले.
राजस्थानने चार षटकांत 31 धावा करत तीन विकेट गमावल्या होत्या. यानंतर पहिला सामना खेळणाऱ्या महिपाल लोमेरने रॉबिन उथप्पाबरोबर चौथ्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. उथप्पाने 17 केल्या तर रोमरोरने 47 धावांची खेळी केली. त्यानंतर, रायन पराग आणि लोमर यांनी 35 धावांची भागीदारी केली. परागने 16 धावा केल्या. राहुल तेवतियाने 12 चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने 24 धावांची नाबाद खेळी खेळली. जोफ्रा आर्चरनेही 10 चेंडूत 16 धावा करून त्याला साध दिली. आरसीबीकडून युजवेंद्र चहलने शानदार गोलंदाजी केली. चहलने चार षटकांत 24 धावा देऊन तीन विकेट घेतल्या. तर इसुरु उदानाला दोन विकेट घेतल्या.